मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे उर्षा उसगांवकर. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या. छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत असतानाच वर्षा यांनी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. त्यांच्या ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवेशावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या.‘बिग बॉस’ सुरु होण्याआधी त्या ‘बिग बॉस’मध्ये जाणार असल्याच्या अनेक चर्चा होत होत्या. यामुळेच त्यांचा सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील प्रवास संपला होता. ‘बिग बॉस’मध्ये येण्याआधी त्यांच्या अनेक चर्चा होत होत्या आणि आता ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतरही त्यांच्या नावाच्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत.
‘बिग बॉस’च्या घरात येण्याचा त्यांचं प्रवास खूप रंजक होता. त्यांच्या याच प्रवासाबद्दल त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “मी ‘बिग बॉस’च्या घरात येईन असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे या घरात येऊन मी स्वत:लाच एक सरप्राइज दिलं आहे. मी या घरात येणार हे मी फक्त माझ्या नवऱ्याला सांगितलं आहे. माझ्या आईला व माझ्या बहीणींना याबद्दल अजूनही माहित नाही”. यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मी या घरात सहभागी झाल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया मला बघायला आवडेल”. तसेच या घरात मला माझ्या १५ मांजरींना घेऊन जायला आवडेल असंही त्यांनी म्हटलं.
यानंतर त्यांनी रितेश देशमुख यांचे सूत्रसंचालन आवडत असल्याचेही सांगितलं. तसेच “घरातील कोणतं काम त्यांना करायला आवडणार नाही” या प्रश्नाचे उत्तर देताना वर्षा यांनी असं म्हटलं की, “मला गोलाकृती पोळ्या लाटता येत नाहीत. मला १६ माणसांचा स्वयंपाक बनवता येत नाही. बाकी मी कापून देण्याचे वगैरे काम करेन” असं म्हटलं. त्याचबरोबर वर्षा यांनी त्यांच्या रणनीतीबद्दल असं म्हटलं की, “मी सरळ स्वभावाने चालणारी बाई आहे, त्यामुळे मी माझा हा मार्ग कधीही सोडणार नाही आणि उगाच फुटेज मिळवण्यासाठी किंवा कंटेट देण्यासाठी मी काहीही करणार नाही” असं म्हटलं आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या पहिल्याच दिवशी निक्की व वर्षा यांचं भांडण झालं आहे. वर्षा उसगांवकरांमुळे जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झालेला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वर्षा उसगांवकर आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या घरात न भांडताही आपलं वर्चस्व राखणार का? घरातील सर्व तरुण स्पर्धकांशी त्या नेमक्या कशा वागणार? टास्कमध्ये त्या कशा पद्धतीने सहभागी होणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.