‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून एका स्पर्धकाची झालेली एक्झिट साऱ्यांना खटकली. यंदाच्या पर्वातील स्ट्रॉंग प्लेअरपैकी एक म्हणजे अरबाज पटेल हा होता. मात्र कमी मत पडल्यामुळे अरबाजला या घरातील त्याचा प्रवास संपवून घराबाहेर पडावं लागलं. ‘बिग बॉस’च्या घरात अरबाजने निक्की तांबोळीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अरबाज घरात असताना तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आलेला पाहायला मिळाला. प्रेमप्रकरणामुळे अरबाजबाबत अधिक चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर आल्यानंतर अरबाजने माध्यमांना मुलाखती दिल्या. (Arbaaz Patel On Marriage)
यावेळी त्याने फिल्मीमंत्रा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याने दोन लग्नावरुन विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. “तुला एका वेगळ्या जातीतील मुलीशी प्रेम झालं, समज जर ती मुलगी हिंदू असेल तर तू दोन लग्न करशील का?”, असा प्रश्न अरबाजला विचारण्यात आला. यावर उत्तर देत अरबाज असे म्हणाला की, “मला असे वाटते की नाही हे शक्य नाही. एक असताना दुसऱ्या मुलीला सांभाळणं आताच्या जगात शक्य नाही. आणि तसे करण्याची परवानगीही नाही आहे. आमच्या धर्मात असे बोलले जाते की, चार लग्न करायची परवानगी आहे पण हे बोललं जायचं तो काळ लढाईचा होता. त्या लढाईंमध्ये अनेक लोक शहिद व्हायचे तेव्हा ती एकटी स्त्री तिचे पुढील आयुष्य कसे काढेल याचा सारासार विचार करुन एखादा पुरुष तिची जबाबदारी घ्यायचा. माझं नाव त्या महिलेला दिल्याने तिच्यावर कोणी बोट उचलणार नाही या विचाराने लग्न व्हायची. तस पाहायला गेलं तर पत्नीच्या परवानगीशिवाय लग्न करणं चूक आहे. या गोष्टीला पूर्णतः बिगडवून टाकलं आहे”.
अरबाजच्या या उत्तरानंतर त्याला पुन्हा एक प्रश्न विचारला, “समज जर तुला एका हिंदू मुलीशी प्रेम झालं आहे तर तू एक लग्न हिंदू रितीरिवाजाने आणि एक मुस्लिम रितीरिवाजाने करशील का?”. या प्रश्नाचं उत्तर देत अरबाज म्हणाला, “नाही. असं नाही करु शकत. आम्ही एकच लग्न करु शकतो. जर हिंदू मुलीशी लग्न करायचं असेल तर ते निकाहमध्ये येणार नाही. निकाह तेव्हा केला जातो जेव्हा त्या मुलीने इस्लाम धर्म कबूल केलेला असतो. आणि जर निकाह करायचा असेल तर इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल. आणि कोर्ट मॅरेज वगैरे करायचं असेल तर त्यात काहीच निर्बंध नाहीत. आजच्या जगात तर कोर्ट मॅरेज दूर कपल्स लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. आणि लिव्हिंगमध्ये राहून त्यांना जमत असेल तर ते लग्न पण करण्यास प्राधान्य देत नाही आहेत”.
यापुढे अरबाजला असा प्रश्न विचारला की, “तुझी लग्न करायची इच्छा आहे की नाही?”, यावर उत्तर देत तो म्हणाला, “हो. लग्न करणे आमच्यात महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे लग्न हे करावंच लागणार. आणि एक आहे तेवढंच पुरे आहे. आजची एक महिला दहा स्त्रियांच्या बरोबर आहे. त्यामुळे एकाशी लग्न करणार तिचं दहा जणींच्या बरोबर असणार तर आणखी लग्न करुन काहीच फायदा नाही”.