टेलिव्हीजनवरील ‘एक हजारो मे मेरी बहना’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. या मालिकेमद्धे क्रिस्टल डिसुजा व निया शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दोन बहीणींमधील प्रेम असा आशय या मालिकेचा होता. या मालिकेने खूप लोकप्रियता मिळवली. क्रिस्टलला या मालिकेमुळे अधिक पसंती मिळाली. या मालिकेनंतर ती अनेक मालिका व वेबसीरिजमध्ये दिसून आली. पण आता ती अभिनय किंवा मालिकेमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने आता मनोरंजन विश्वाची पोल खोलली आहे. यामध्ये तिने कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागले याबद्दल तिने भाष्य केले आहे. (krystle d’souza on television industry)
क्रिस्टलने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यामध्ये तिने आरोग्यसंबंधी असलेल्या समस्या असतानाही खूप मेहनत केली होती. तिने २०-३० तास उभं राहून काम केलं आहे. तिने सांगितले की, “सुरुवातीला मला २५०० रुपये प्रती दिवस मिळायचे. त्यावेळी फक्त १२ तासच शूट व्हावं यासाठी कोणतेही नियम किंवा समिती नव्हती. मी न थांबता ६० तास शूट केले आहे. मी अनेकदा सेटवर पण बेशुद्ध पडले आणि टीमला रुग्णवाहिकादेखील बोलवावी लागली होती”.
पुढे तिने सांगितले की, “मला सलाईन लावायचे आणि औषधं घेऊन मी पुन्हा शूटसाठी हजर व्हायचे. मला रुग्णालयात जाण्यासाठीदेखील वेळ नसायचा. ते लोक पूर्ण रुग्णालयच सेटवर आणायचे. हे सगळं मला खूप कठीण जात होतं. मी चालू शकत नव्हते. पण माझ्यासाठी कामामध्ये व्यवस्थित असणं जास्त गरजेचं होतं”.
तसेच क्रिस्टलने सांगितले की, “मी चांगली नाही. असं मला नेहमी वाटायचं. तसेच आर्थिक समस्यादेखील मला खूप आल्या. पण टेलिव्हीजनने मला मजबूत बनवलं, आत्मविश्वास वाढवला आणि माझी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मदत केली. मला आता जे काही मिळालं आहे ते फक्त टेलिव्हीजनमुळे मिळालं आहे”. क्रिस्टलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ‘ब्रह्मराक्षस’, ‘फितरत’, ‘एक नयी पहचान’, ‘बेलन वाली बहू’ व ‘बात हमारी पक्की’ या मालिकांमध्ये दिसून आली होती.