Dhananjay Powar New Car : ‘बिग बॉस मराठी’ मुळे विशेष चर्चेत असलेला स्पर्धक म्हणजे कोल्हापूरचा धनंजय पोवार. ‘बिग बॉस’च्या घरात असताना डीपी त्याच्या विनोदी बुद्धीमुळे विशेष चर्चेत आला. आणि ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतरही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हवा असलेली पाहायला मिळाली. लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे डीपी ‘बिग बॉस’च्या अंतिम फेरीत टॉप-४ पर्यंत पोहोचला. डीपीने त्याच्या स्वभावाने आणि खेळाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. डीपी त्याच्या व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असतो. अशातच डीपीने त्याच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. डीपीने नवी कोरी कार घेतली असल्याचं समोर आलं आहे. नव्या गाडीची पहिली झलक त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
डीपीने त्याच्या नव्या गाडीमध्ये त्याच्या कुटुंबाला बसून एक राउंड मारलेला पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या या नव्या गाडी घेण्यामागचं कारणही समोर आलं आहे. डीपीने व्हिडीओ शेअर करत नवी गाडी घेण्यामागचं कारण सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये डीपी असं बोलताना दिसत आहे की, “असं काहीतरी करायचं जेणेकरुन लोकांनी आपलं साम्राज्य बघावं. दीड वर्षांपूर्वी वडिलांनी एक स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्या नातवडांनी सनरुफमधून बाहेर यावं असं त्यांना नेहमी वाटायचं आणि आज तो दिवस आहे जेव्हा या सनरुफमधून माझी मुलं बाहेर आली”.
पुढे तो म्हणाला, “माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य बघा, या माझ्या आईच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य बघा. गाडी घेण्याचं कारण फक्त एकच वडिलांना हेच हवं होतं की, त्यांच्या नातवंडांनी या सनरुफमधून बाहेर यावं. त्याचा ( सनरुफ ) आनंद त्यांनी घेतला पाहिजे. फक्त या गोष्टीसाठी ही नवीन गाडी घेतली. माझ्याकडे गाडी होती, ती जुनी गाडी विकली आणि ही नवीन गाडी घेण्याचं कारण म्हणजे फक्त वडिलांनी पाहिलेलं स्वप्न”.
आणखी वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदे लवकरच लग्न करणार, थाटामाटात झालं केळवण, फोटो व्हायरल
पुढे त्याने म्हटलं आहे की, “आयुष्याचा आनंद हा फक्त पैशात नाहीये. तर, खरा आनंद आपल्या घरातल्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात आहे”. असं म्हणत धनंजयने त्याच्या चाहत्यांना ही आलिशान गाडी खरेदी करण्याचं खरं कारण सांगितलं आहे. धनंजयच्या पोस्टवर असंख्य चाहत्यांनी या नव्या गाडीसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अंकिता वालावलकरने, “शेवटी भाव कोणाचो” अशी कमेंटही केली आहे.