Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकमंडळी तुफान राडे करताना दिसत आहेत. अवघ्या काही दिवसांतच या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. अशातच शेवटच्या आठवड्यांमध्ये ‘बिग बॉस’ने थेट आठहीच्या आठ स्पर्धकांना नॉमिनेट केलं. दरम्यान, सोमवारी घरात आणखी एक टास्क पार पडला. यामध्ये घरात ठामपणे मत मांडता न येणाऱ्या सदस्यांना टार्गेट करायचं होतं. यावेळी ‘बिग बॉस’ यांनी घरात दोन टीम पाडल्या होत्या. यावेळी अंकिताने तिच्या विरुद्ध टीममधील निक्की व सूरजच नाव घेतलं. अंकिताने सूरजच नाव घेत त्याला टार्गेट केलं हे अनपेक्षित होतं.
अंकिताने सूरजला नॉमिनेट नाही तर टार्गेट केलं ही गोष्ट अनेकांच्या लक्षात आली नाही त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोलही केलेलं पाहायला मिळालं. तर काहींनी अंकिताची बाजू घेत तिने जे केलं ते टास्कसाठी केलं असल्याचं म्हटलं. सूरजला टार्गेट करण्याचं योग्य असं कारणही अंकिताने दिलं त्यावेळी निक्कीने मध्ये तोंड घालत तिला टोकलं. आणि सूरजचा भडकवण्याचा प्रयत्न केला. यावरुन अंकिता व निक्कीमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.
आणखी वाचा – उर्मिला मातोंडकर लग्नाच्या आठ वर्षांनंतर पतीपासून होणार विभक्त?, घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती
सूरजला टार्गेट केल्याच्या प्रकरणावर आता माजी ‘बिग बॉस’ स्पर्धक घनःश्याम दरवडे याने देखील केलेलं भाष्य लक्षवेधी ठरत आहे. घनःश्यामने अंकिताची कानउघडणी करत तिचा निर्णय चूक असल्याचं म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. घनःश्यामने या व्हिडीओला “अंकिता ताई तू फार चुकीचं केलंस”, असं कॅप्शन दिलं आहे. छोटा पुढारी या व्हिडीओमध्ये असं म्हणताना दिसत आहे की, “बिग बॉस’च्या घरात सदस्यांना टार्गेट करण्याचा टास्क होता. यावेळी अंकिताने सूरजला ठाम मतं मांडता येत नाही, गेम समजत नाही हे निकष देऊन टार्गेट केलं”.
पुढे तो म्हणाला, “अगं, अंकिता ताई सर्वांना माहितीये सूरजला गेम किती कळतो, त्याला खेळता येतं की नाही आणि त्याला किती मतं मांडता येतात. या गोष्टी आता सर्वांना माहिती आहेत. पण, तू त्याला सख्ख्या भावासारखं मानलं आहेस. एकीकडे तू म्हणतेस मी सूरजला घर बांधून देणार आणि दुसरीकडे ‘बिग बॉस’चं घर त्याच्याकडून हिरावून घेतेस. हे कितपत योग्य आहे? अंकिता ताई, तू गेम खेळ पण, सहानुभूतीचा खेळ नको खेळूस. ही माझी विनंती आहे”.