Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. हा खेळ संपायला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अंतिम लढतीत जाण्यासाठी घरातील स्पर्धक एकमेकांना भिडताना पाहायला मिळत आहेत. अशातच बिग बॉसदेखील या स्पर्धकांमध्ये ट्विस्टद्वारे भांडण व वाद घडवून आणत असल्याचे पाहायला मिळत आहे. अरबाज पटेल हा घरचा कॅप्टन होता, मात्र तो या घरातून एलिमिनेट झाल्यामुळे आता बिग बॉसच्या घरात कुणीच कॅप्टन नाही आणि यामुळे घरात कामावरुन अनेकदा वाद होतात. त्यामुळे घरात कॅप्टन होऊन कामे वाटली जावी यासाठी बिग बॉस कडून एक नवीन टास्क देण्यात आला. (Bigg Boss Marathi 5New Promo)
सांगकामे आणि मालक असं या नवीन टास्कचे नाव असून या टास्कमध्ये जिंकणारी टीम ही मालक असणार आहे आणि पराजित होणारी टीम सांगकामे. यात एक टीम अंकिता, पॅडी, अभिजीत आणि जान्हवी अशी आहे तर दुसरी टीम, डीपी, सूरज, वर्षा व निक्की अशी आहे. पहिल्या फेरीत अंकिता व निक्की यांच्यात चांगली लढत होते. पण लगोरी पूर्ण न झाल्याने निकाल अनिर्णित लागतो. हेच पॅडी व डीपी यांच्याबाबतही होते. अशातच या टास्कचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यात अंकिता व वर्षा एकमेकींना भिडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या नवीन टास्कमध्ये अंकिता सुरुवातीला चांगला खेळ खेळते मात्र वर्षा ही तिला चांगल्याच भिडतात. पण वर्षा यांना प्रतिउत्तर करताना अंकिता त्यांचा हात आणि पाय खेचण्याचा प्रयत्न करते.एकीकडे अंकिता वर्षा यांना खाली ढकलून देत असल्याचेही पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे ती त्यांना जमिनीवर खेचत असल्याचेही पाहायला मिळत आहे. या दरम्यान निक्की वर्षा यांची बाजू घेत मध्ये मध्ये ताई चिपकुन बसा, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात ताई..,हा कुस्तीचा गेम नाहीये, किती घाणेरडा गेम खेळत आहे ही” असं अंकिता विरुद्ध बोलताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या लगोरी टास्कमध्ये आतापर्यंत दोन फेऱ्या झाल्या असून यात एकाही टीमला बाजी मारता आलेली नाही. त्यामुळे आजच्या भागात स्पर्धकांमध्ये या टाकवरून काय राडा होणार आहे. हे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत. ६ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले होईल आणि या आठवड्यासाठी सर्वच स्पर्धकांना नॉमिनेट केले जात आहे, असेही जाहीर करण्यात आले. त्यामुळे सर्व स्पर्धकांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. उर्वरित १४ दिवसांमध्ये या स्पर्धकांनी दिसणं आणि प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवणं फार गरजेचं आहे.