Urmila Matondkar and Mohsin Akhtar Mir Divorce : मराठीसह बॉलिवूड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि सौंदऱ्याने सर्वांना मोहित करणारी अभिनेत्री व राजकारणी म्हणजे उर्मिला मातोंडकर. उर्मिला ही तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायमच चर्चेत राहत असते, मात्र नुकतीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका कारणामुळे चर्चेत आली आहे आणि हे चर्चेचं कारण म्हणजे अभिनेत्रीचा घटस्फोट. उर्मिला पती मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. उर्मिलाने आठ वर्षांपूर्वी काश्मिरी व्यावसायिक व मॉडेल असलेल्या मोहसीनशी आंतरधर्मीय लग्न केलं. आता दोघांच्याही नात्यात दुरावा आला आहे, असे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पती मोहसिनपासून विभक्त होत आहे. तिला तिच्या कामावर लक्ष केंद्रित करून चित्रपटांमध्ये परतायचे आहे. (Urmila Matondkar Divorce News)
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई न्यायालयातील एका सूत्राने सांगितले की उर्मिला मातोंडकरने खूप विचार करुन आणि समजून घेतल्यानंतर मोहसीनबरोबरचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कोर्टात घटस्फोटाची याचिकाही दाखल केली आहे. त्यांच्या विभक्त होण्याचे कारण समजू शकलेले नाही. दोघांच्या परस्पर संमतीने हा घटस्फोट होत नसल्याचेही सांगण्यात आले. या अफवांचे सत्य अद्याप बाहेर आलेले नाही. उर्मिला व मोहसीन २०१६ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. उर्मिला मातोंडकरने लग्नाच्या आठ वर्षानंतर पती मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. ‘ई टाइम्स’ने मुंबईतील एका न्यायालयातील सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे”.
उर्मिला व मोहसीन परस्पर सहमतीने विभक्त होत नसल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे. न्यायालयातील एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “खूप विचार केल्यानंतर उर्मिलाने मोहसीनबरोबरचे लग्न संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तिने आधीच कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. विभक्त होण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही, पण तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. हा घटस्फोट परस्पर सहमतीने होत नाही आहे”. मोहसीन अख्तर मीर हा काश्मीरमधील एक व्यावसायिक आणि मॉडेल आहे. वयाच्या २१व्या वर्षी ते काश्मीरहून मुंबईत आले.
बॉलिवूडमध्ये काहीतरी करायचं हे त्याचं स्वप्न होतं. २००९ मध्ये आलेल्या ‘इट्स अ मॅन्स वर्ल्ड’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर तो ‘लक बाय चान्स’, ‘मुंबई मस्त ‘मुंबई मस्त कलंदर’ आणि ‘बीए पास’ या चित्रपटांमध्ये दिसला. नंतर त्यांनी अभिनय सोडून व्यवसायाच्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. उर्मिला व मोहसीन यांची भेट त्यांचा मित्र आणि बॉलीवूड डिझायनर मनीष मल्होत्रा मार्फत झाली होती. दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी खासगी समारंभात लग्न केलं होतं. उर्मिला व मोहसीन यांच्या वयात १० वर्षांचे अंतर आहे, त्यामुळे यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. उर्मिला ५० वर्षांची आहे, तर मोहसीन ४० वर्षांचा आहे.