‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळत आहेत. नुकत्याच दिलेल्या जादुई टास्क दरम्यान स्पर्धकांमधील चढाओढ पाहायला मिळाली. यावेळी स्पर्धकांच्या गळ्यात एका स्पर्धकाचे नाव अडकवण्यात आलं होतं आणि खेळामध्ये या स्पर्धकांना न दाखवलेली मेहनत कशी होती, खेळात हा स्पर्धक अपात्र कसा आहे याची कारणे देऊन त्या स्पर्धकाला नॉमिनेट करायचे होते. या जादुई टास्कमध्ये अंकिता वालावलकरच्या गळ्यात जान्हवी किल्लेकरची पाटी अडकवण्यात आली होती. त्यामुळे योग्य ते कारण देऊन जान्हवीला नॉमिनेट करण्याची संधी अंकिताजवळ होती. (Bigg Boss Marathi Season 5)
जादुई दिव्या पर्यंत जान्हवीला बचावण्यासाठी अंकिता पोहचू शकत नाही तेव्हा तिला कारण देऊन जान्हवीला नॉमिनेट करणं भाग पडतं. तेव्हा अंकिता वैयक्तिक कारण देत जान्हवीला नॉमिनेट करण्याचा प्रयत्न करते. जादुई दिव्यापर्यंत न पोहचल्याने अंकिता या फेरीतून बाद झालेली पाहायला मिळते आणि अंकिताने यावेळी वैयक्तिक कारण म्हणजेच गेला कॅप्टनसी टास्क दरम्यान झालेल्या वादाचं कारण देत जान्हवीला नॉमिनेट केलं असल्याचं पाहायला मिळतंय. अंकिताने जान्हवीला सूरज कॅप्टन झाल्यावर तो कॅप्टन पदासाठी लायक नसल्याचे म्हटलं होत त्यामुळे जान्हवी सगळ्यांनाच पाण्यात बघते असं कारण देत तिने नॉमिनेट केलं.
टास्कदरम्यान अंकिताने गुलीगत फेम सूरजसाठी स्टॅण्ड घेतला. गेल्या आठवड्यात घरात झालेल्या कॅप्टन्सी कार्यात जान्हवीने “सूरज कॅपेबल नाही” असं म्हटल्याने अंकिताला वाईट वाटलं. अखेर आज संधी मिळताच अंकिताने जान्हवीला नॉमिनेट केलं आणि सूरजच्या वतीने खंबीरपणे बाजू मांडली. मात्र, नॉमिनेशनसाठी वैयक्तिक नव्हे, तर फक्त खेळासंदर्भातील निकष द्यायचे होते. अंकिताने योग्य कारण न दिल्याने तिचं मतं रद्द करण्यात आलं. तरीही ‘बी टीम’ने शेवटपर्यंत हार मानली नाही. याउलट सूरजची खंबीरपणे बाजू घेतल्याने नेटकरी अंकिताचं भरभरुन कौतुक करत आहेत.

दरम्यान, टास्क दरम्यान अंकिताने सूरजची बाजू घेतल्यामुळे या आठवड्यात अंकिताला सेफ करा अशी मागणी केली जात आहे. अंकिताला सूरजच्या चाहत्यांचा पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. अनेक नेटकरी अंकिताने जिंकली नसली तरी तिने सूरजची साथ दिली, म्हणून तिचं कौतुक करताना दिसत आहेत.