मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : बायकोने मिठी मारताच ढसाढसा रडू लागला अभिजीत, लेकींनाही पाहून रडू आवरेना, भावुक व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 26, 2024 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 abhijeet sawant emotional video

बायको व लेकीला भेटून अभिजीत सावंतला रडू आवरेना, व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सीझन सध्या विशेष चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात अभिनेते, अभिनेत्रींबरोबर गायकही या घरात सहभागी झाले होते. अशातच यंदाच्या पर्वात मराठमोळा गायक अभिजीत सावंतच्या एन्ट्रीने साऱ्यांना अतिशय आनंद झाला. अभिजीत या शोमुळे विशेष चर्चेत आलेला पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरात अभिजीत पहिल्या दिवसापासून सर्वांबरोबर मिळून मिसळून राहत गेम खेळत आहे. याशिवाय त्याचे जास्त कोणाशी वाद देखील झालेले नाहीत. त्यामुळे अभिजीतचा स्वभाव प्रत्येकाला भावतोय.

अगदी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सुद्धा अनेकदा अभिजीतचं कौतुक केलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर प्रत्येक सदस्याला कुटुंबीयांकडून आलेले व्हिडीओ मेसेज दाखवले होते. यावेळी अभिजीतच्या दोन्ही मुलींनी लाडक्या बाबासाठी खास व्हिडीओ बनवून पाठवला होता. “तू उत्तम खेळत आहेस. असा खेळत राहा. इंडियन आयडॉल जिंकलास तेव्हा आम्ही नव्हतो पण, आता ‘बिग बॉस’ जिंकताना आम्हाला तुला पाहायचंय” असं त्याच्या दोन्ही मुली या व्हिडीओमध्ये म्हणाल्या होत्या. आहना आणि स्मिरा अशी त्याच्या मुलींची नावं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : …अन् निक्की रडली! टास्कदरम्यान घडली मोठी चूक, कमावली फक्त ‘इतकी’ रक्कम, नेमकं काय घडलं?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

त्यानंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांच्या कुटुंबियांची एण्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ सर्व सदस्यांना फ्रिज होण्याचे आदेश देतात. आणि घराचा दरवाजा उघडतो आणि अभिजीतची पत्नी घरात एंट्री करते. ती येऊन अभिजीतला मिठी मारते आणि त्याला किसही करते. अभिजीतला बायकोला पाहून अश्रू अनावर होतात. त्यानंतर अभिजीतला आणखी एक मोठं सरप्राईज मिळतं.

आणखी वाचा – ‘केबीसी १६’ चा पहिला करोडपती ठरला जम्मू-काश्मीरचा २२ वर्षीय युवा, अचूक उत्तर देऊनही गमावले सात कोटी रुपये

अभिजीतच्या दोन्ही मुली आहना आणि स्मिरा यादेखील घरात येतात आणि धावत येत अभिजीतला घट्ट मिठी मारतात. दोन्ही मुलींना दोन महिन्यांनी समोर पाहून अभिजीत ढसाढसा रडतो, तर त्याच्या दोन्ही मुलीही बाबाला समोर पाहून रडू लागतात. यावेळी घरातील इतर स्पर्धकांचेही डोळे पाणवतात. तर घरात येताच अभिजीतची धाकटी लेक ‘बिग बॉस’ यांना सवाल करते, ती “‘बिग बॉस’ मी इथे राहू शकते का?”, असं विचारते, हे ऐकून ‘बिग बॉस’ तिला उत्तर देत, “चला या पर्वाला आणखी एक वाईल्ड कार्ड स्पर्धक मिळाला”, असं म्हणतात. हे ऐकून सगळेच खूप खुश होतात, आणि अभिजीतच्या लेकींबरोबर गप्पा-गोष्टी करु लागतात.

Tags: abhijeet sawant familybigg boss marathibigg boss marathi 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Archana Puran Singh Personal Life

घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा लग्न करण्यास तयार नव्हती अर्चना पूरण सिंह, पाच वर्ष लहान मुलाशी विवाह केला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.