Ankita Prabhu Walawalkar Boyfriend : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व जरी संपलं असलं तरी यंदाच्या या पर्वाची सर्वत्र क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदाचा बहुमान सूरज चव्हाणने पटकावला तर अभिजीत सावंत हा रनर अप ठरला. वादग्रस्त शोपैकी एक असलेल्या या लोकप्रिय शोने यंदाचं हे पर्व विशेष गाजवलं. यंदाच्या या पर्वात कलाकार मंडळींसह गायक, रील स्टार, रॅपर, नेते मंडळी यांना देखील खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला. या पर्वात सगळेच स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसले. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हवा पाहायला मिळाली. हे पर्व संंपल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आले आहे.
या पर्वामध्ये फायनलिस्ट ठरलेल्या अंकिता प्रभू वालावलकरचे वैयक्तिक आयुष्य विशेष चर्चेत आहे, कारण या कोकण हार्टेड गर्लने ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यापूर्वी तिच्या आयुष्यात ‘कोकण हार्टेड बॉय’ असल्याचे सांगितले होते. मात्र अंकिताने तिचा बॉयफ्रेंड नक्की कोण आहे याबाबतचा खुलासा केला नाही. त्यामुळे कोकणहार्टेड बॉय नेमका कोण आहे हा प्रश्न साऱ्यांना पडला. आता लवकरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार असून या चर्चांना लवकरच पूर्णविराम मिळणार आहे.

यापूर्वी अंकिता व ओंकार भोजने यांचेही नाव जोडले गेले होते, मात्र ही अफवा स्वत: अंकिताने एका मुलाखतीत नाकारली होती. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर आल्यानंतर अंकिताने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तिचा बॉयफ्रेंड हा मनोरंजन क्षेत्रात असल्याचा खुलासा तिने केला. यानंतर आता अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये तिच्या चाहत्याने, “तुझा घो कोण आहे हे आता सांग. ‘बिग बॉस’ झालं आहे. मी खूप उत्सुक आहे”, असं म्हटलं आहे. यावर अंकिताने उत्तर देत, “१२ ऑक्टोबर”, असं म्हटलं आहे.

याशिवाय अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट हाच तो मुलगा असल्याचं म्हटलं. अंकिताची ही पोस्ट संगीत दिग्दर्शक कुणाल भगत बरोबरची आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत, “हाच सिक्रेट बॉयफ्रेंड आहे कळलं”, “गीतकार सिक्रेट बॉयफ्रेंड हाच आहे तर”, असं म्हटलं आहे. कुणाल एक संगीत दिग्दर्शक असून तो आणि अंकिता खरोखर डेट करतायंत का हे येत्या दसऱ्याला समजणार आहे.