70th National Film Awards 2024 Full Winner List : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेच्या ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पार पडणार असून या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विजेत्यांना सन्मानित करत आहेत. यंदाचा सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली होती आणि हे पुरस्कार आता प्रदान करण्यात येणार आहेत. १६ ऑगस्ट रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. (70th National Film Awards 2024 Full Winner List)
यामध्ये प्रशांत नीलचा चित्रपट ‘के.जी.एफ. चाप्टर २’ जिंकला, ज्याने दोन श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले. तर ‘गुलमोहर’ या मालिकेसाठी मनोज बाजपेयीला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटासाठी प्रीतमला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे. ऋषभ शेट्टीला ‘कांतारा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर नित्या मेनन, मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे.
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ला देण्यात आला. ‘वाळवी’ हा चित्रपट २०२३ साली पडद्यावर आला. परेश मोकाशी यांना हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर झी स्टुडिओजनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. डार्क कॉमेडी प्रकारातला हा रहस्यपट असून या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांनी भूमिका साकारल्या आहेत.
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी :
दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार – मिथुन चक्रवर्ती
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – अट्टम (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सूरज बडजात्या (उंची)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (पार्श्वभूमी) – ए.आर. रहमान (पोनियिन सेल्वन १)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार – कांतारा (ऋषभ शेट्टी)
राष्ट्रीय, सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – कच्छ एक्सप्रेस (गुजराती)
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – ‘के.जी.एफ. चाप्टर २’
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – पोन्नियिन सेल्वन १
सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट – कार्तिकेय २
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी
सर्वोत्कृष्ट अभिनेता – ऋषभ शेट्टी (कंतारा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नित्या मेनन (तिरुचित्राबलम), मानसी पारेख (कच्छ एक्सप्रेस)
विशेष उल्लेख पुरस्कार – मनोज बाजपेयी (सर्वोत्कृष्ट अभिनेता – गुलमोहर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता (उंची)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन राज मल्होत्रा (फौजा, हरियाणवी चित्रपट)
सर्वोत्कृष्ट चित्रपट ॲनिमेशन-व्हिज्युअल इफेक्ट्स – ब्रह्मास्त्र भाग १ (अयान मुखर्जी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) – बॉम्बे जयश्री (सौदी वेलक्का)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) – अरिजित सिंह (ब्रम्हास्त्र – केसरिया)
सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार – प्रीतम (ब्रह्मास्त्र)
सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार – नौशाद सदर खान (फौजा-हरियाणवी चित्रपट)
सर्वोत्कृष्ट संपादन पुरस्कार – अट्टम (मल्याळम)