शनिवार, सप्टेंबर 5, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीवरुन जय दुधाणेला अटक, प्रतिक्रिया देत म्हणाला, “हनिमूनसाठी जात असताना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 5, 2026 | 8:48 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jay Dudhan arrested

पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीवरुन जय दुधाणेला अटक, प्रतिक्रिया देत म्हणाला, “हनिमूनसाठी जात असताना…”

Jay Dudhan arrested : मराठी कलाविश्वात काही दिवसांपूर्वीच एक खळबळजनक बातमी कानावर आली. अभिनेत्री हेमलता बाणे हिला खंडणी प्रकरणात अटक झाल्याच यावेळी समोर आलं. या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याला अटक झाली असल्याचं समोर आलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘बिग बॉस मराठी’चा उपविजेता जय दुधाणे आहे. काही दिवसांपासून जय सोशल मीडियावर चर्चेत असलेला पाहायला मिळाला. ११ दिवसांपूर्वी जय दुधाणेचा थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. लग्नाच्या ११ दिवसांनी हनिमूनला जातानाच विमानतळावरुन जयला अटक केली असल्याच समोर आलं आहे. पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात ही अटक झाली असल्याचे समोर आलं आहे.

‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार जय दुधाणे म्हणाला, “वडिलांची जबाबदारी घेतली, पण लोक माझ्यावरच उलटले आहेत. सत्य लवकरच समोर येईल. मी कुठे पळून गेलो नाही. जे आहे त्याला सामोरं जाणार. पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. माझ्या आजी-आजोबांनाही सोडलं नाही. गाळा विकल्यावरून ही अफवा कोण पसरवत आहे, तेच समजत नाही. तसं काही असेल तर तुम्ही सिद्ध करुन दाखवा. हा खोटा गुन्हा आहे आणि मी माझा चेहरादेखील लपवला नाही. सत्य लवकरच समोर येईल. माझ्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आयुष्यात अशा अनेक अडचणी आपल्यासमोर येतात, त्यांना सामोरं जाण्याची हिंमतदेखील असली पाहिजे आणि ती माझ्यात आहे”.

आणखी वाचा – साऊथ अभिनेत्याची मद्यधुंद अवस्थेत चारचाकीला धडक; अपघातादरम्यान ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

याविषयी तो पुढे म्हणाला, “मी माझ्या हनिमूनसाठी जात होतो. मी, माझी बायको, माझा भाऊ आणि त्याची बायको असे चौघेजण परदेशात जात होतो. माझ्या नावाचं अटक पत्र आहे हे मलाच माहिती नव्हतं. पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे मी पोलिसांना सामोरं जाणार आहे”.

आणखी वाचा – लिप किस केलं, गुडघ्यावर बसून प्रपोज अन्…; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखपुडा, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

नेमकं प्रकरण काय?
जय दुधाणेच्या कुटुंबियांचे काही गाळे पोखरणरोड क्रमांक एक भागात आहेत. हे गाळे एका खासगी बँकेकडे तारण आहेत. असे असतानाही त्यांनी हे गाळे त्याच भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला विक्री करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या गाळ्यांच्या मोबदल्यात जय दुधाणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी तक्रारदार यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ४ कोटी ६१ लाख रुपये घेतले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी जय दुधाने याला विमानतळावरुन अटक केली.

Tags: entertainemnt newsJay Dudhan arrestedmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
shashank ketkar

"निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा…", पैसे थकबाकी प्रकरणावर शशांक केतकरची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला, "एकही तारीख पाळली नाही आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.