बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा…”, पैसे थकबाकी प्रकरणावर शशांक केतकरची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला, “एकही तारीख पाळली नाही आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 5, 2026 | 9:27 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
shashank ketkar

शशांक केतकरची संतप्त पोस्ट

Shashank Ketkar angry post  : सिनेसृष्टीत अशी बरीच प्रकरण कानावर आली आहेत ज्यात अनेक कलाकारांचे मानधन रखडवले आहे. यावरुन या कलाकारांनी आवाजही उठवलेला पाहायला मिळाला. अशातच आता एका मराठी अभिनेत्याने गेल्या पाच वर्षात काम केलेल्याचे पैसे दिले नसल्याचे म्हणत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या अभिनेत्याने पैसे न दिल्या प्रकरणी आपलं मत मांडल आहे आणि राग व्यक्त केला आहे. हा अभिनेता म्हणजेच मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा शशांक केतकर. शशांकने यापूर्वी ही बरेचदा हे प्रकरण बाहेर काढलं होतं. पैसे न दिल्या प्रकरणी त्याने आवाज उठवलेला पाहायला मिळाला.

आता या प्रकरणाला पाच वर्षे पूर्ण होताच अभिनेत्याने थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. इतकंच नाही तर अभिनेत्याने या स्पष्टीकरणाशिवाय डिटेल व्हिडीओ काय असेल हे जर उद्यापर्यंत पैसे नाही आले तर पोस्ट करत सांगणार असल्याची धमकी सुद्धा दिली आहे. शशांक नेहमीच सोशल मीडियावर त्याची मतं स्पष्टपणे मांडत आला आहे. ट्रॅफिक संदर्भात असो, रस्त्यावरील खड्डे प्रकरण असो वा एखाद्या राजकीय पक्षाबाबत असो शशांक नेहमीच निडरपणे स्पष्ट असं मत मांडत आला आहे. यांत आता भर घालत त्याने पैसे रखडवल्याबाबत आवाज उठविला आहे.

आणखी वाचा – पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीवरुन जय दुधाणेला अटक, प्रतिक्रिया देत म्हणाला, “हनिमूनसाठी जात असताना…”

शशांकने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिले, “पाच वर्षे होऊन गेली. मागची पाच वर्षे आणि ८ ऑक्टोबर २०२५ पासून पुन्हा संपर्क निर्माण झाल्यानंतर दिलेली एकही तारीख त्या निर्मात्याने पाळली नाही. थोडक्यात काय निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा आता कंटाळा आला आहे. उद्याची म्हणजेच ५ जानेवारी २०२६ ही अजून एक तारीख त्याने दिली आहे. पूर्ण पेमेंट जमा झाले नाही तर सगळ्या कुंडलीसकट एक डिटेल व्हिडीओ करेन”, अशा तीव्र शब्दात त्याने निर्मात्याची शाळा घेतली आहे.

आणखी वाचा – साऊथ अभिनेत्याची मद्यधुंद अवस्थेत चारचाकीला धडक; अपघातादरम्यान ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

शशांकने असेही लिहिले की, “पेमेंट झाले तर ते मिळाले, असाही व्हिडीओ पोस्ट करेन”. अद्याप शशांकची ही पोस्ट संभ्रमात टाकणारी आहे. कारण अभिनेत्याने अद्याप तो कोणत्या प्रोजेक्टबद्दल बोलत आहे याबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे नेमकं हे प्रकरण कोणाबाबत आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.

Tags: entertainmentmarathi actorshashank ketkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Next Post
Ranapati Shivray Swari Agra Marathi Movie

साक्षात छत्रपती शिवाजी महाराजच; उपस्थित अभिनेत्याला शिवरायांच्या भूमिकेत पाहतच राहिले अन्…; मराठी चित्रपटाची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.