Bigg Boss Marathi new update : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दोन टीम पडल्या आहेत. या दोन्ही टीम आपापल्या पद्धतीने लढा देत आहेत. एकमेकांच्या विरोधात जात ही स्पर्धक मंडळी स्वतःला सिद्ध करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या या घरात बरीच नाती निर्माण झालेलीही पाहायला मिळाली.
दरम्यान निक्की तांबोळी व अरबाज पटेल या स्पर्धकांमध्ये प्रेमाचे बंध फुलताना दिसले. निक्की व अरबाज यांच्यात बरेचदा जवळीकही निर्माण झालेली पाहायला मिळाली. मात्र बरेचदा दोघांमध्ये वादही झालेले दिसले. हा वाद दुसऱ्या टीममधील अभिजीतमुळे झाले. अभिजीतमुळे निक्की व अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं समोर आलं आहे. निक्कीची अभिजीतबरोबरची मैत्री ही तिच्या टीममधील सर्व स्पर्धकांना खटकते. खासकरुन ही मैत्री अरबाजला आवडत नाही आहे. यावरुन अरबाज व निक्कीमध्ये बरेच वाद झाले.
निक्की व अभिजीतची मैत्री याबद्दल अरबाजने आक्षेपही नोंदवला आहे. आता ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की डीपीजवळ येत तिचं मन मोकळं करताना दिसत आहे. निक्की डीपीजवळ येते आणि बोलते की, “मला वीट आला आहे. माझा हा बेस्ट बर्थडे आहे. आणि याबाबत मी ‘बिग बॉस’चे आभारही मानणार आहे. कारण माझे डोळे उघडले आहेत. एकमेकांवर जेलसी वगैरे होतंच. तू बोल माझ्याशी, माझ्याशी भांड पण एकत्र राहूया. टॉपला जायचं तर एकत्र जाऊया”.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू दिशाचा खरा चेहरा अहिल्यादेवींसमोर आणू शकेल का?, प्रिया-प्रीतमची साथ आणि…
पुढे ती म्हणाली, “मी डंके के चोट वाली मुलगी आहे. जर मी तुमहाला पण मित्र मानलं तर मी या संपूर्ण घराशी लढेन. पण तुमच्यात हा समजूतदारपणा हवा की, की निक्कीला मीच हवा आहे. ती १०० लोकांशी बोलली तरी तिला मीच हवा आहे हे का कोणी समजून घेत नाही. आज मी अभिजीतबरोबर ४-५ वेळा बसली आहे. पण मला वाटत की तो मला समजून घेतो. त्याच्या डोळ्यात बघून मी विचारलं तू मला समजून घेणार का?, तर तो हो बोलला. झालं मग”.