शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाकीचे तोंड बंद करुन बसले आणि…”, वर्षा उसगांवकरांच्या बाजूने न बोलणाऱ्यांवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली, “त्यांना रडताना…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 31, 2024 | 2:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi new season update Ganga aka Pranit Hatte shared a post and expressed his anger on Varsha Usgaonkar's insult by Nikki Tamboli.

"बाकीचे तोंड बंद करुन बसले आणि…", वर्षा उसगांवकरांच्या बाजूने न बोलणाऱ्यांवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली, "त्यांना रडताना…"

‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाला सुरुवात भांडणांनी झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून् निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच कालच्या भागात निक्कीने वर्षा ताईंबरोबर भांडण करताना आपली पातळी सोडली. घरातील सर्व सदस्य लिव्हिंग परिसरात बसले असताना ‘बिग बॉस’ जे जे घरातील बेडवर बसले होते त्यांच्यामुळे इतर सदस्यांना शिक्षा सूनावतात. बेडवर बसलेले सदस्य हे अरबाज, अभिजीत व वर्षा उसगांवकर असतात. त्यांनी नियम भंग केल्यामुळे ‘बिग बॉस’ घरातील सदस्यांना शिक्षा सुनावतात. बेड संबंधित नियम उल्लंघन केल्यामुळे संपूर्ण आठवडा बेडशिवाय सदस्यांना झोपण्याची शिक्षा बिग बॉसने दिली. यावेळी निक्कीचा पार चढला आणि तिने वर्षा उसगांवकरांमुळेच ही शिक्षा घरातील सदस्यांना झाल्याचा आरोप केला.

निक्कीने वर्षाताईंबरोबर केलेल्या या भांडणावर चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच गंगा म्हणजेच अभिनेत्री प्रणित हाटेने सोशल मीडियावर वर्षाताईंबद्दलची एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये प्रणित असं म्हणाली की, “‘बिग बॉस मराठी’च्या भागात निक्की तांबोळी ज्या पद्धतीने वर्षा उसगांवकर यांच्याशी बोलत आहे, ते अत्यंत भयानक आहे. ती निक्की जी कोणीही असेल. पण आपल्या ज्येष्ठ कलाकारांशी कसं वागावं, बोलावं याची एक समज असते.  सोफ्यावर त्या एकट्याच बसल्या होत्या असं नाही. इतर स्पर्धकदेखील बसले होते. गार्डनच्या परिसरात काही स्पर्धक बेडवरही बसले होते”.

View this post on Instagram

A post shared by Pranit Hatte (@h_pranit_official)

आणखी वाचा – खाण्यावरुनही निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकरांना टोकलं, जोरजोरात ओरडू लागली अन्…; इतर सदस्य गप्प का?

यापुढे प्रणित असं म्हणाली की, “वर्षा तंगड्या वर करुन झोपते. हे किती विचित्र वाक्य आणि किती अपमान करणारं वाक्य आहे. त्यामुळे आता यावर रितेश देशमुख यांची काय प्रतिक्रिया असणार? हे बघायचं आहे. कारण घरात ज्येष्ठ कलाकारांना असं रडताना आणि अपमानित होताना बघून खूपच वाईट वाटतं. त्यामुळे कोणीतरी निक्कीला बोललं पाहिजे होतं. तिथले सगळे तोंड बंद करुन बसले होते. पण एकामध्येही हिंमत झाली नाही पुढे येऊन निक्कीला “तू चुकीची आहेस” हे बोलण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे आता हे सगळं रितेश देशमुखच्या हातात आहे. त्याची यावर काय प्रतिक्रिया असणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.” 

आणखी वाचा – “आलिया भोगासी…”, निक्कीने वर्षा उसगांवकरांची अक्कल, माज काढल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्यानेचा टोला नक्की कोणाला?, पोस्ट व्हायरल

या व्हिडीओसह प्रणितने “निक्की तांबोळी ज्याप्रकारे वर्षा उसगांवकर मॅडमशी वागत आहे, हे अत्यंत लज्जास्पद आहे. आपल्या ज्येष्ठ कलाकारांशी कसं बोलावं हे समजून घेणं तिनं गरजेचं आहे. त्यामुळे रितेश देशमुखने योग्य भूमिका घेऊन वर्षा उसगांवकरांच्या पाठिशी उभं राहायला पाहिजे” असं कॅप्शनही दिलं आहे. त्यामुळे आता आगामी भागांत रितेश कुणाची कशी शाळा घेणार? हे पाहणे  उत्सुकतेचे ठरणार आहे.    

Tags: bigg boss marathi new seasonBigg Boss Marathi New Season Entertainment NewsPranit Hatte
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada fame Adhipati Actor Hrishikesh Shelar shared the story of eating a frog during his trip to America

"अमेरिकेमध्ये बेडूक खाल्ला अन्…", 'तुला शिकवीन…'मधील अधिपतीने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली, "इतरांनी मगर खात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.