Smriti Irani On Ask Me Anything : स्मृती इराणी सध्या एका विशेष गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत. राहुल गांधी यांना फ्लाइंग किस केल्याच्या आरोपामुळे त्या सध्या चर्चेत आहेत. दरम्यान, आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही विशेष चर्चा रंगलेली दिसतेय. सध्या कलाकार मंडळी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी ते ‘आस्क मी एनिथिंग’ हा सेशन घेत असतात. दरम्यान, अलीकडेच स्मृती इराणी यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेतले होते. ज्यात त्यांनी सगळ्याचं प्रश्नांना खूप छान उत्तरे दिली आहेत. दरम्यान, एका युजरने पती झुबिन इराणीच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. ज्याला उत्तर देताना स्मृती म्हणाली की, ‘मोना तिची बालपणीची मैत्रीण नाही’.
स्मृती इराणी यांनी ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनमध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी सोप्या पद्धतीने दिले आहे. मात्र या सेशन दरम्यान एका यूजरने असा प्रश्न विचारला ज्यावर स्मृती चिडल्या आहेत. स्मृती इराणी यांना एका युजरने विचारले की, तिने तिच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या पतीशी लग्न केले आहे का? युजरच्या या प्रश्नाला उत्तर देत स्मृती म्हणाली, ‘मोना माझी बालपणीची मैत्रीण नाही’.
पाहा नेटकऱ्याच्या प्रश्नावर काय म्हणाल्या स्मृती इराणी (Smriti Irani On Ask Me Anything)
स्मृती यांनी लिहिले आहे की, ‘नाही सर… मोना माझ्यापेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे ती माझी बालपणीची मैत्रीण असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ती एक कौटुंबिक व्यक्ती आहे, राजकारणी नाही, त्यामुळे तिला त्यात ओढू नका. माझ्याशी भांडा, माझ्याशी वाद घाला, माझा अपमान करा, पण ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा माणसाला तुमच्या सोबत गटारात ओढू नका. ती आदरास पात्र आहे’.
स्मृती इराणी यांच्या ‘आस्क मी एनीथिंग’ या सेशनसाठी त्यांचे कौतुक होताना दिसतंय. कारण यापूर्वी कोणत्याही राजकारण्याने असं केलेलं नाही. दुसरीकडे, स्मृतींनी हे कृत्य अशा वेळी केले जेव्हा त्या राहुल गांधींवर आरोप केल्याने सतत चर्चेत होत्या.