bigg boss marathi jay dudhane : मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसले. सोहम बांदेकर-पूजा बिरारी, मेघन जाधव -अनुष्का पिंपुटकर, तेजस्विनी लोणारी, सुरज चव्हाण ही कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकली. सगळ्यांनी अतिशय जल्लोषात आणि पारंपरिक अंदाजात लग्नसोहळा उरकला. तर काही अभिनेत्री लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं समोर आलं. यांत रुमानी खरे, गायत्री दातार ही कलाकार मंडळी आहेत. यापाठोपाठ आता आणखी एक मराठमोळा अभिनेता लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणे आता लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. जयच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे.
सोशल मीडियावर जय दुधाणेच्या केळवणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडला प्रपोज करत त्याने रिलेशनशिपमध्ये असल्याची जाहीर कबुली दिली. अभिनेता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि प्रसिद्ध युट्युबर हर्षला पाटीलसह लग्न करणार आहे. नुकतंच जयच्या कुटुंबीयांनी त्यांचं थाटामाटात केळवण केलं. मुंबईतील प्रसिद्ध रेस्टारंट माजघर येथे जयच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला.
कुटुंबीयांनी जयसाठी खास केळवण समारंभाचं आयोजन केलं होतं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केळवनावेळी जयच सर्वांनी मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. यानंतर अभिनेत्याचं औक्षण करण्यात आलं. जयला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले. यावेळी त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्यासह उपस्थित असून आनंदी असल्याचं पाहायला मिळालं.
आणखी वाचा – “आमची जमीन विकून देणगीदारांचे पैसे…”, ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीचा कठीण काळ; म्हणाल्या, “देवाने मला…”
Splitsvilla, ‘बिग बॉस मराठी ३’ या शोमधून घराघरांत लोकप्रिय झाला. Splitsvilla च्या १३ व्या पर्वाचा जय विजेता ठरला. यानंतर अभिनेत्याने ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात प्रवेश घेतला आणि तिथे तो उपविजेता ठरला. याशिवाय ‘स्टार प्रवाह’च्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत सुद्धा त्याने काम केलं होतं. मात्र, काही महिन्यांनी वैयक्तिक कारणास्तव जयने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. आता जय लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.





