मराठी मालिकांमध्ये झळकलेली एक ओळखीचं नाव म्हणजे अभिनेत्री सोनाली पाटील. ‘वैजू नं. १’, ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये सोनालीने काम केलं आहे. याबरोबरच, ती ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. या कार्यक्रमामुळे सोनालीच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. सध्या ती मालिकांमध्ये काम करत नसली, तरी म्युझिक अल्बममध्ये ती आपल्याला अनेकदा दिसली आहे. (Bigg Boss Marathi fame actress Video)
सोनाली पाटील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती तिचे व्हिडिओज व फोटोज तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत राहते. असाच एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या शेतात शेतीकाम करताना दिसत आहे. त्याचबरोबर ती एका गाण्यावर थिरकलीदेखील आहे.
हे देखील वाचा – प्रसाद खांडेकर दिग्दर्शित पहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ओंकार भोजनेसह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार दिसणार
सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रींच्या हातात शेतीचे अवजार दिसत असून ती तिच्या शेतजमिनीत शेतीकाम करताना दिसत आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओबरोबरच्या पोस्टमध्ये “Joyful moments 💕 फुल वावर इस अवर, धीस इस शेतकऱ्यांची पावर #शेतकऱ्याचीपोर” असं कॅप्शन सोनालीने दिलं आहे. सोनालीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – ‘नवा गडी नवं राज्य’ मलिका बंद होणार असल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “आता ही मालिका…”
अभिनेत्री सोनाली पाटील ‘बिग बॉस’नंतर विविध कार्यक्रमांना हजेरी लावते. शिवाय, सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे ती अनेकदा चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी सोनाली ‘जय जय योगेश्वर शंकर’ या मालिकेबरोबर ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेतही दिसली होती. तिच्या मालिकेतील भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.