शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

इतकी सुंदर व गोंडस दिसते सई लोकुरची लेक, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, म्हणाली, “आई म्हणून माझा…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 5, 2024 | 1:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi fame actress Sai Lokur show her girl face for the first time and also shared a special post

सई लोकूरने पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा, स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधत शेअर केली खास पोस्ट

छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री सई लोकुर सोशल मिडियावर कायम सक्रीय असते. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. सईने बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. ती काही चित्रपटातही झळकली. सईने २०२० साली तीर्थदीप रॉय याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने इंडस्ट्रीला रामराम केला आणि संसारात रमली. त्यानंतर २०२३ मध्ये सईने गुड न्यूज देत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. लग्नाच्या तीन वर्षांनंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी तिने गोंडस मुलीला जन्म दिला. सईच्या मुलीचे नाव ताशी रॉय असं आहे. (Sai Lokur Girl Face)

सई सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ती तिच्या लेकीबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. अशातच सईने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेली एका पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने पहिल्यांदाच तिच्या मुलीचा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. सईने याआधी तिच्या मुलीबरोबरचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले होते. मात्र तिने कधीच तिच्या मुलीचा चेहरा दाखवला नव्हता.

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “ग्रुपमध्ये मला शून्य किंमत आणि…”, डीपीची नाराजी, ग्रुपमध्ये राहणार नसल्याचंही अंकिताला सांगितलं, म्हणाला, “नीट उत्तरही…”

अशातच तिने आता पहिल्यांदाच खास फोटो शेअर केला आहे. सईने लेकीबरोबरचा गोंडस फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “आज माझ्या वाढदिवसाच्या या शुभ प्रसंगी, मी तुम्हाला देवाने मला दिलेल्या सर्वोत्तम भेटवस्तूची ओळख करुन देऊ इच्छिते. माझी प्रिय मुलगी ताशी. तिचा पहिल्यांदाच फोटो शेअर करत आहे. ती माझ्यासाठी जग आहे आणि मी तिच्यावर किती प्रेम करते हे मला शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आई म्हणून हा माझा पहिला वाढदिवस आहे आणि मी देवाकडे आणखी काही मागू शकत नाही. ताशी ही माझे जीवन आहे आणि ती मला मिळालेली सर्वात चांगली भेट आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की जान्हवीला करतेय टार्गेट, घन:श्यामच्या खांद्यावर बंदूक ठेवून अभिजीतला घराबाहेर करण्याचं प्लॅनिंग अन्…

दरम्यान, सईने आजवर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनं जिंकलं. ती एक उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याबरोबर ती छान नृत्यांगणाही आहे. सई ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे चांगलीच चर्चेत आली होती. या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिचा सिनेसृष्टीतील वावर बराच कमी झाला.  यांपैकी एक आहे. या दघाी एक आहे.

Tags: marathi actresssai lokurSai Lokur Girl Face
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 surekha kudachi angry post

Bigg Boss Marathi : "सतत अरबाजच्या अंगावर पाय टाकून…", निक्कीवर भडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, "डोक्यात जाते जेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.