सध्या ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व खूप चर्चेत आहे. १०० दिवसांचे हे पर्व यावेळी ७० दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या कार्यक्रमात फॅमिली स्पेशल एपिसोड पार पडला. यामध्ये सर्व सदस्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. घरामध्ये उपस्थित राहिल्यानंतरचे सगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ पाहून सगळ्यांचेच अश्रु अनावर झाले होते. अशातच आता यामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेच्या इच्छा पूर्ण होताना दिसत आहेत. (rakhi sawant in bigg boss marathi)
काही दिवसांपूर्वी निक्की तांबोळी आणि तिच्या टीमने घातलेला गोंधळ पाहून प्रेक्षक राखी सावंत घरात येऊदे अशी इच्छा व्यक्त करत होते. सोशल मीडियावरदेखील या संदर्भातील पोस्ट व्हायरल होताना दिसत होत्या पण आता प्रेक्षकांची हीच इच्छा पूर्ण झाली आहे. नवीन प्रोमोमध्ये राखी सावंतने घरात एंट्री घेतल्याचे दिसत आहे. तिच्या एंट्रीने महाराष्ट्रातील जनतेला खूप आनंद झाला आहे. मात्र राखीला घरात बघताच निक्कीच्या तोंडचं पाणी पाळालेलं बघायला मिळत आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “राखीशिवाय ‘बिग बॉस’ पूर्णच होऊ शकत नाही”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “शेवटी प्रेक्षकांची इच्छा बिग बॉसने पूर्ण केली. आता मजा येणार बघायला. थॅंक यु सो मच बिग बॉस. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला”, तसेच तिसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “आली एकदाची निक्कीची जिरवायला”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “आली रे आली आता निक्की तुझी बारी आली”, तसेच अभिनेता अक्षय केळकरने देखील प्रतिक्रिया देत ‘प्रेम’ असं लिहिलं आहे.
दरम्यान राखीच्या घरात येण्याने आता काय धमाल पहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. तसेच निक्कीला राखी आता नक्की कसा त्रास देणार हे पाहाण्यासारखे आहे. कुणाचं काही ऐकून न घेणारी निक्की आता राखी सावंत पुढे कशी टिकणार? राखी पुढे तिचा निभाव लागणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. यासाठी अनेकांनी उत्सुकताही व्यक्त केली आहे