शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आता निक्कीची जिरणार”, राखी सावंतच्या एन्ट्रीवर प्रेक्षक खूश, म्हणाले, “आनंदी आनंदा झाला कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 28, 2024 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rakhi sawant in bigg boss marathi

राखी सावंतच्या बिग बॉसमधील एंट्रीने प्रेक्षक आनंदित झाले

सध्या ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व खूप चर्चेत आहे. १०० दिवसांचे हे पर्व यावेळी ७० दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या कार्यक्रमात फॅमिली स्पेशल एपिसोड पार पडला. यामध्ये सर्व सदस्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. घरामध्ये उपस्थित राहिल्यानंतरचे सगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ पाहून सगळ्यांचेच अश्रु अनावर झाले होते. अशातच आता यामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेच्या इच्छा पूर्ण होताना दिसत आहेत. (rakhi sawant in bigg boss marathi)

काही दिवसांपूर्वी निक्की तांबोळी आणि तिच्या टीमने घातलेला गोंधळ पाहून प्रेक्षक राखी सावंत घरात येऊदे अशी इच्छा व्यक्त करत होते. सोशल मीडियावरदेखील या संदर्भातील पोस्ट व्हायरल होताना दिसत होत्या पण आता प्रेक्षकांची हीच इच्छा पूर्ण झाली आहे. नवीन प्रोमोमध्ये राखी सावंतने घरात एंट्री घेतल्याचे दिसत आहे. तिच्या एंट्रीने महाराष्ट्रातील जनतेला खूप आनंद झाला आहे. मात्र राखीला घरात बघताच निक्कीच्या तोंडचं पाणी पाळालेलं बघायला मिळत आहे.

आणखी वाचा- राखी सावंत पाठोपाठ अभिजीत बिचुकलेंचा Bigg Boss च्या घरात प्रवेश, एण्ट्री करताच डायलॉगबाजी, सदस्यांची खरडपट्टी काढणार

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “राखीशिवाय ‘बिग बॉस’ पूर्णच होऊ शकत नाही”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “शेवटी प्रेक्षकांची इच्छा बिग बॉसने पूर्ण केली. आता मजा येणार बघायला. थॅंक यु सो मच बिग बॉस. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला”, तसेच तिसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “आली एकदाची निक्कीची जिरवायला”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “आली रे आली आता निक्की तुझी बारी आली”, तसेच अभिनेता अक्षय केळकरने देखील प्रतिक्रिया देत ‘प्रेम’ असं लिहिलं आहे.

आणखी वाचा – “तांबोळी तुला सोडून येणार आंबोली”, राखी सावंतची Bigg Boss च्या घरात एण्ट्री, निक्कीच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग

दरम्यान राखीच्या घरात येण्याने आता काय धमाल पहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. तसेच निक्कीला राखी आता नक्की कसा त्रास देणार हे पाहाण्यासारखे आहे.  कुणाचं काही ऐकून न घेणारी निक्की आता राखी सावंत पुढे कशी टिकणार? राखी पुढे तिचा निभाव लागणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. यासाठी अनेकांनी उत्सुकताही व्यक्त केली आहे

Tags: nikki tambolirakhi sawantviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Suraj Chavan Actor Abhijeet Kelkar shared a special post

"आर्थिक-समाजिक समानता लोकशाही देऊ शकली नाही पण…", सूरजबाबत मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, "एका शोने त्याला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.