Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात सुरुवातीपासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले असल्याचे पाहायला मिळाले. अरबाज व निक्कीची स्ट्राँग मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ शकतं असा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला. ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या सीझनला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात फ्लर्टिंग सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मग दुसऱ्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात आणखी एक प्रेम प्रकरण सुरू होतंय का, याची चर्चा सुरु झाली होती. (Bigg Boss Marathi 5 Vaibhav Chavan)
रांगड्या मातीत ‘परदेसी’ प्रेमाचं रोपटं फुललेलं दिसून आलं. बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले गेले. पण त्यांच्याट मैत्रीपलीकडे फार काही दिसून आलं नाही. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अरबाज, जान्हवी, निक्कीबरोबरची वैभवची घट्ट मैत्री पाहायला मिळाली. इरीना बरोबरची त्याची मैत्री ही खूपच खास होती आणि त्यांची हीच मैत्री मात्र प्रेक्षकांना भावली. अशातच ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर येताच वैभवने त्याच्या व इरीनाच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. आमच्यात मैत्रीपलीकडे काही होतं असं मला वाटतं नाही असं त्याने म्हटलं आहे.
आणखी वाचा – Video : मायरा वायकुळला भाऊ झाल्यानंतर रुग्णालयात कुटुंबियांचा एकच जल्लोष, दीदी झाले म्हणत रडू लागली अन्…
याबद्दल वाभाव असं म्हणाला की, “आमची मैत्री नक्कीच चांगली होती आणि त्यापलीकडे काही होतं असं मला वाटतं नाही पण आमची मैत्री खूपच छान होती. घरात बाकीच्यांबरोबर मला जितकं जुळवून घेता आलं नाही तितकं मी तिच्याशी जुळवून घेतलं. तिने खूप साऱ्या गोष्टी मला समजावून संगितल्या. ती खूप हुशार होती, मला असं वाटतं की ती घरात राहायला पाहिजे होती. ती घरात असती तर खूप साऱ्या गोष्टी बदलता आल्या असत्या. आमच्या दोघांचा स्वभाव खूपच सारखा होता. त्यामुळे आम्ही एकमेकांबरोबर जास्त गप्पागोष्टी करत होतो.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “इरीनाबरोबर राहताना कोणतीच गोष्ट घडवून आणलेली नव्हती. आमची मैत्री ही खूपच छान आणि निरागस होती. इरीनाबरोबरचे घरातील क्षण चांगले गेले. त्यामुळे हीच मैत्री घराबाहेरही राहावी अशी माझी इच्छा आहे”. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या सातव्या आठवड्यात या घरातील एकूण सहा स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यापैकी वैभव चव्हाणचा घरातील प्रवास संपला आहे. बारामतीचा रांगडा गडी असलेल्या वैभवकडून प्रेक्षकांना जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढा त्याचा खेळ काही दिसला नाही, त्यामुळे प्रेक्षक नाराज होते.