Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा प्रवास आता अवघ्या काही तासांमध्ये संपणार आहे. १०० दिवसांसाठी निश्चित झालेला हा शो अवघ्या ७० दिवसात आटोपणार असून ६ ऑक्टोबर रोजी या सीझनचा महाअंतिम सोहळा प्रसारित होणार आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल. अशातच जाता जाता घरातील स्पर्धकांना ‘बिग बॉस’ आनंद देणार आहेत. आतापर्यंत ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेले सदस्य पुन्हा एकदा टॉप ६ स्पर्धकांना भेटण्यासाठी येणार आहेत. सकाळीच या स्पर्धकांच्या एन्ट्रीचा प्रोमो सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आला होता. अशातच आता सोशल मीडियावर काही आणखी व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत, ज्यात बिग बॉसच्या घरातील माजी स्पर्धक टॉप ६ स्पर्धकांना भेटणार आहेत. (Bigg Boss Marathi 5 Vaibhav and Janhavi)
सोशल मीडियावर वैभव चव्हाण व जान्हवी किल्लेकर यांच्या सांभाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी व वैभव त्यांच्या गेमप्लॅन बद्दल बोलत आहेत. तसंच या व्हिडीओमध्ये हे दोघेही त्यांच्या चुकलेल्या मैत्रीच्या निर्णयाबद्दलही एकमेकांशी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी ती वैभवला असं म्हणते की, “तुझी खूप आठवण आली. तू गेल्यानंतर मी एकटीच रडत बसायची आणि ‘बिग बॉस’बरोबर बोलत बसायचे. तू गेल्यावर तर मी कुठल्या वेगळ्याच धुंदीत होते”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi चे टॉप ६ स्पर्धक, पण सूरजलाच सर्वाधिक सपोर्ट, तुमचं मत कोणाला?
यापुढे ती असं म्हणते की, “तू जेव्हा गेलास तेव्हा मी निक्कीला म्हटलं की, तू बोलली होती ना की आपण चौघे (जान्हवी, अरबाज, निक्की, वैभव) शेवटपर्यंत राहू मग वैभव का गेला. एलिमिनेशनवेळी पण मी टेन्शनमध्ये होते. मला वाटत होतं की, मी आता जात आहे की काय…” यापुढे वैभव तिला असं म्हणतो की, “आपण आधीपासूनच विरोध करत आलो असतो तर शेवटपर्यंत असतो”.
यापुढे जान्हवी वैभवला असं म्हणते की, “आपण जर बी टीममध्ये असतो तर सर्वांना खाल्लं असतं. आपली मैत्री चुकली. पण याचा दोष मी त्यांना नाही देऊ शकत. हीच गोष्ट मी मीडियासमोरदेखील सांगितली. कारण मैत्रीचा निर्णय हा आपलाही होता. यामुळे मी निक्कीला चूक नाही म्हणू शकत”. पुढे वैभवदेखील तिच्या म्हणण्याला संमती देत असं म्हणतो की, “अपण याचा दोष कुणालाचा देऊ शकत नाही. कदाचित मला गंडवायला त्यांना सोपं असेल.”