‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांची जुगलबंदी सुरु झालेली पाहायला मिळत आहे. एकमेकांना टार्गेट करुन ग्रुप बनवण्याकडे स्पर्धकांचं अधिक लक्ष असलेलं पाहायला मिळतं आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’मध्ये १६ स्पर्धक असून केवळ कलाकारच नव्हे तर रील स्टार, कीर्तनकार, गायक यांची पर्वणी पाहायला मिळत आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’ मध्ये कोकण हॉटेल गर्ल कोकण कन्या अंकिता वालावलकरच्या एण्ट्रीने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अंकिता वेळोवेळी घरामध्ये संभाषणाद्वारे आपलं मत मांडताना दिसत आहे. आणि हे मत काहींना खटकताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi 5 Updates)
अशातच ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या दिवसाच्या भागात असं पाहायला मिळालं की, जान्हवीकडे निक्की अंकिताची चुगली करते. निक्की सांगते की, “मी किनोवा बनवलं होतं ते तिला मिळालं नव्हतं पण ते तिला मी थोड्या वेळात मिळेल असं सांगत होते तेव्हा तिनं तोंड वाकडं केलं. मी आरशातून हे पाहिलं”, अशी चुगली ती करत असते. त्यावेळेला निक्की म्हणते की, “माझा राग खूप आहे. मी त्या वेळेला हे बोलू शकले असते पण मला खूप भूक लागली होती आणि मला कोणतंच भांडण करायचं नव्हतं नाहीतर माझं भांडण नसतं माझा भतंगडा असतो”. हे ऐकून जान्हवी हसू लागते. तर निक्की तेव्हा असेही म्हणते की, “मी तिला तोंडावर हे विचारल्याशिवाय राहणार नाही. वेळ आली की मी सर्व काही बोलणार”.
त्यानंतर सगळेजण गार्डन एरियामध्ये बसलेले असतात तेव्हा अरबाजकडून किनोवाचा विषय निघतो. त्यावर निक्की लगेचच म्हणते की, “काय तुम्ही माझ्या किनोवाबद्दल बोलत आहात”. त्यावर निक्की अंकिताला स्पष्ट विचारते की, “तुला किनोवा मिळाला नाही तेव्हा तू सुद्धा तोंड वाकडं केलं”. हे ऐकून अंकिता चकित होते आणि सांगते की, “त्या आधीच्या वाक्यावर काहीतरी असेल पण मी तुझ्या खाण्यावरुन तुला काहीच केलेलं नाही. काहीच बोललेले नाही”. तेव्हा निक्की सांगते की, “मी आरशातून पाहिलं की तू याला सांगून तोंड वाकडं केलं”.
निक्की जान्हवीकडे म्हणते की, “ही आता माझ्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करत आहे. हिला कळले आहे की, आता मला ही गोष्ट कळून चुकली आहे”. हे ऐकल्यावर जान्हवी निक्कीला असं म्हणते की, “ही खूप चॅप्टर आहे. खूप चॅप्टर”. अशा रीतीने जान्हवी निक्कीला समर्थन देत अंकिताची बाजू मांडताना दिसते. आता निक्की व जान्हवी अंकिताला त्यांच्या ग्रुपमध्ये घेणार का?, की त्यांचा वाद होणार?, हे सारं पाहणं येणाऱ्या भागात रंजक ठरेल.