Bigg Boss Marathi 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात कोकण हार्टेड गर्लच्या एण्ट्रीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंकिता वालावलकर हिने अभिनेता निखिल दामले याच्यासह घरात एण्ट्री घेतली. अंकिता याच्या येण्याने अनेकांना आनंद झाला आहे. कलाकार मंडळीही अंकिताला सपोर्ट करताना दिसत आहेत. अंकिता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विशेष सक्रिय असून ती विविध कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेट अँकर म्हणून तिने जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच रील स्टार म्हणून अंकिताचा सुरु झालेला हा प्रवास साऱ्यांनी पाहिला आहे.
अशातच अंकिताच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. अंकिताने ही पोस्ट खास तिच्या नवऱ्यासाठी शेअर केली आहे. या पोस्टवरुन अंकिता लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र अंकिताचा होणारा नवरा नेमका कोण आहे हे गुपित समोर आलेलं नाही. अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने ‘बिग बॉस’च्या घरात येण्याआधी तिला सल्ला दिला आहे. यामुळे तिने त्याचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने तिच्यासाठी खास ‘बिग बॉस’ असं लिहिलेला केक आणला होता. शिवाय तिच्यासाठी महागडी भेटवस्तूही आणली”.
अंकिताने ही पोस्ट शेअर करत, “प्रिय कोकण हार्टेड बॉय. रात्री २ वाजता यशस्वी भव: हे गिफ्ट घेऊन येणं रोमँटिक समजू की काळजी? कारण ‘बिग बॉस’मधे जाण्यासाठी दोन दिवस होते. खरंतर आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते. तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलंस. तुझे शब्द माझी ताकद आहेत. तु हिमतीने माझ्याबरोबर उभा आहेस हे बघुन आईपण निश्चिंत आहे. तुझी सगळी वाक्य लक्षात ठेऊन या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. जेव्हा लग्न करु अस आपण ठरवलं आणि ‘बिग बॉस’ची ऑफर आली, माझ्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती त्यात मी ठरवलं की तुला जे योग्य वाटेल ते करेन”.
पुढे ती म्हणाली, “पण तू म्हणालास, “माझा विचार नको करु. मी आजही आहे ,उद्याही असेन पण तू मेंटली नीट राहणार असशील तर जा. लवकर ये पण जिंकुन ये, आलीस की लग्न करु फक्त जशी आहेस तशीच वाग, जिंकण्यासाठी खोटं वागु नकोस, हरलीस तरी चालेल, हे सगळं लक्षात ठेऊन जात आहे. लवकरच येईन पण छान राहुन येई. तू तयारीला लाग. तुझ्याबरोबर १९५ देश फिरायचे आहेत”. फुलांची खूप आठवण येईल आणि येत आहे. dyson चा बॉक्स फाडून यशस्वी भव: लिहिण्याची शिक्षा आल्यावर दिली जाईल. तुझीच, गुणी पोरगी”, असं म्हटलं आहे.