Bigg Boss Marathi 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय रिऍलिटी शोच्या नव्या पर्वाने साऱ्यांची उत्सुकता वाढवून ठेवली आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस’ने अभिनेत्यांसह रील स्टार, कीर्तनकार, रॅपर, मॉडेल यांना संधी दिली आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’मध्ये धुमाकूळ घालायला कोकणकन्या म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर दिसत आहे. तर प्रेक्षकांना खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा या शोमध्ये रील स्टार सूरज चव्हाणला देखील घेण्यात आलं. सुरजला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
‘बिग बॉस’च्या घरात पाहायला गेलं तर सर्व १६ स्पर्धकांमध्ये या दोन म्हणजेच अंकिता वालावलकर व सूरज चव्हाण यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. हे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या उमेदवारीसाठी योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी दोघांवर निशाणा साधला आहे. अनेकांनी अंकिता व सूरजच्या एण्ट्रीनंतर नाराजी व्यक्त केली आहे. कोकण हार्टेड गर्लचा पुढे पुढे करण्याचा स्वभाव त्यांना खटकला आहे. तर सूरज या रिऍलिटी शोसाठी पात्र नाही असं अनेकांनी म्हटलं आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील अंकिताच्या प्रोमोखाली अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. “कोकणातील साधी सुधी मुलगी म्हणून लोकांनी हिला डोक्यावर घेतले. आता ही टिपिकल सेलिब्रिटी नखरे करायला शिकली आहे. खूप ओव्हरस्मार्ट झाली”, “हे कोकण विनाशी पार्सल घरी बसवा”, “पहिली हिला बाहेर काढणार”, “हिला कशाला आणलं आहे”, “कोकणच्या जीवावर जगणारे आणि त्यावर उठणारे जास्त वेळ टिकू शकत नाही. एकच जिद्द रिफायनरी रद्द”, असं म्हटलं आहे.
तर सुरजच्या प्रोमोखाली, “इच्छाच उरली नाही आता बिग बॉस बघायला”, “पहिला हाच आऊट होईल वाटत”, “आज बिग बॉस बघणार होतो पण आता बघायची इच्छा नाही”, “यंदा फेल जाणार बिग बॉस”, “अतिशय फालतू होणार आहे. यावेळी कोणते स्पर्धक उचलून आणलेत कळत नाही .अपेक्षेपेक्षा अति फालतू अजिबात मज्जा आली नाही. आज मराठी म्हणून अजिबात शब्दाला जागर नाही”, “देवा. मी किती आतुरतेने बघत बसलो होतो ‘बिग बॉस’ची पण मला गुलीगत धोखा भेटला रे”, “जग कुठे चाललं आहे आणि आमच्या महाराष्ट्रात असे बुक्कित टेंगुलचे नमुने घेऊन वाहिन्या पुढील पिढीला काय संदेश देणार आहेत. एक नंबरचा फालतू शो आहे”, त्यांनी असं म्हणत त्याला ट्रोल केलं आहे.