‘बिग बॉस मराठी’च्या नवीन सीझनची मोठ्या दणक्यात सुरुवात झालेली आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार होता. १०० हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झाले आहेत. या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे. बिग बॉसच्या घरात नेते, अभिनेते यांसह रीलस्टार आणि कीर्तनकार सहभागी झाले आहेत. वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
यंदाच्या पर्वात रीलस्टारचा दबदबा पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी अंकिता वालावलकर यांची एंट्री झाली असून आता यात धनंजय पोवार व सूरज चव्हाण यांचाही समावेश झाला आहे. ‘गुलीगत धोका’ फेम रिल स्टारची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली असून उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी, धनंजय पोवार यांनीही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.
दरम्यान, नुकतीच ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीसह जिओ सिनेमावरही पाहता येणार आहे. रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघता येणार आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.