शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “मी तुझ्यासारखी रिकामी नाही”, नको त्या मुद्द्यावरुन अभिजितशी वाद घालतेय निक्की, नक्की सिद्ध करायचंय काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 5, 2024 | 11:42 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 nikki and abhijeet fight

अभिजीत सावंत व निक्की तांबोळी यांच्यात पुन्हा युक्तिवाद

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा सध्या सहावा आठवडा सुरु आहे. गेल्या आठडव्यात या घरात अनेक घडामोडी झाल्या. अभिजीत व निक्की यांच्यात अनेक वाद झाले. मात्र त्यांच्यातील हे वाद मध्ये मध्ये संपलेले दिसले. दोघांमध्ये पुन्हा मैत्रीही झालेली दिसली. मात्र नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये हा वाद पुन्हा झालेला दिसला. ‘बिग बॉस’च्या घरात टास्क दरम्यान निक्की व अभिजीत पुन्हा भांडताना दिसले. निक्कीला अभिजीतने दिलेले ज्ञान खटकले असल्याचं सांगितलं. शिवाय अभिजीतची शाळा घेत निक्कीने त्याची बोलती बंद केली. मात्र याला अभिजीतनेही सडेतोड उत्तर दिलं.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, निक्की अभिजीतला म्हणते, “तू मला सांगू नकोस. शब्द जपून वापर, मुद्दे कसे मांडत आहेस. तुलाही माहित आहे की या घरात अगदी पहिल्या दिवसापासून मुद्दे मांडत आहे. तू मला म्हटलं शब्द जपून वापर”. यावर अभिजीत वाद घालत म्हणतो, “मी कुठे नाही म्हटलं. कारण त्याच्याआधी तू मला म्हणाली शब्द जरा जपून वापर. तुला कळत नाही का? असंही तू मला म्हणाली. आणि त्याच्यावर मी तुला उत्तर दिलं”. यावर निक्की म्हणते, “मी वैयक्तिक मुद्द्यावर बोलले. तू चुकीचा अर्थ घेतला”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अभिजीत विरोधात प्लॅनिंग करुन आता त्याच्याकडेच गेली निक्की, एकत्र बसलेले पाहून अरबाजला राग अनावर अन्…

यावर अभिजीत म्हणाला, “ज्या गोष्टीला घेऊन तू बोलली त्यालाच मी उत्तर दिलं. मी एकही शब्द वेगळा वापरला नाही. तुला हवं तर तू पूर्ण संभाषण काढून बघ”. यावर निक्की रागात म्हणते, “तेवढा माझ्याकडे वेळ नाही. मी तुझ्यासारखी रिकामी नाही आहे”. यावर अभिजीतही वाद घालत म्हणतो, “माझ्याकडे सुद्धा इतका वेळ नाही”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की जान्हवीला करतेय टार्गेट, घन:श्यामच्या खांद्यावर बंदूक ठेवून अभिजीतला घराबाहेर करण्याचं प्लॅनिंग अन्…

याआधीच्या प्रोमोमध्ये निक्की व अभिजीत एकत्र बोलतानाही दिसले. यावेळी निक्कीची बाजू न घेतल्याने ती अभिजीतला जाब विचारताना दिसली. तू काहीतरी बोलणं अपेक्षित होतं पण तू तसं केलं नाही हे फार चुकीचं केलं असं निक्की म्हणते. निक्की व अभिजीत बोलत असताना अरबाज त्यांच्याकडे रागाने पाहतो. अगदी पहिल्या दिवसापासून अरबाजला निक्की व अभिजीत यांची मैत्री पटत नव्हती. आता निक्की अभिजीतवरील राग टास्कमध्ये काढणार का?, हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5nikki and abhijeet fight
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Dhananjay expressed his wish that he will not part of team B with Ankita, Paddy, Abhijeet, Suraj and Varsha

Bigg Boss Marathi : "ग्रुपमध्ये मला शून्य किंमत आणि…", डीपीची नाराजी, ग्रुपमध्ये राहणार नसल्याचंही अंकिताला सांगितलं, म्हणाला, "नीट उत्तरही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.