रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : निक्कीने आर्याला जेवणावरुन टोकलं, शोमधील त्रास रॅपरला सहन होईना, घराबाहेर पडायचं असल्याचंही सांगितलं आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 24, 2024 | 9:48 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5

निक्कीने आर्याला जेवणावरुन सुनावलं, अभिनेत्रीने घराबाहेर जाण्याचेही म्हटलं, नेमकं प्रकरण काय?

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच काही ना काही वाद, भांडण होताना दिसतात. कोणाच्या खाण्यावरुन, कोणाच्या बोलण्यावरुन, कोणाच्या वागणुकीवरुन इतर स्पर्धकांना बोल लगावले जातात. दरम्यान काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात खाण्यावरुन एक वाद झाला होता. हा वाद डीपी व आर्या जाधव यांच्यामध्ये झाला होता. आर्याने जास्त वेळा जेवण घेतल्याने डीपीने तिला जेवणावरुन टोकल होतं. तेव्हा आर्याला खूप राग आला होता. आर्यानं डीपी बरोबर यावेळी भांडण केलं. माझ्या खाण्यावरुन मला बोलायचं नाही असे स्पष्ट शब्दात सांगत तिने डीपीला टोकलं.

आता डीपीनंतर हा वाद पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळतोय. मात्र हा वाद डीपी नव्हे तर आर्या व निक्की मध्ये झालेला आहे. त्यामुळे आर्या जेवण सोडून निघून जाताना दिसली. या सर्व प्रकरणामुळे आर्या बरीच खचलेली दिसते. आर्याला अश्रू अनावर झालेलेही पाहायला मिळाले. ‘बिग बॉस’च्या घरात रॅपर म्हणून आलेली आर्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढताना दिसत आहे. निक्की जान्हवी यांना तर ती एकटी भारी पडते. बरेचदा तिचं निक्की- जान्हवी बरोबर वाजलेले पाहायला मिळालं. मात्र आता पुन्हा एकदा आर्या व निक्कीमध्ये जेवणावरुन बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अभिजीत पुढे जाऊन घात करणार असल्याची पॅडी-डीपीला भिती, दोन्ही बाजूने बोलतो म्हणून…; टीम फुटणार?

निक्की आर्याला जेवणावरुन टोकताच आर्याला अश्रू अनावर झाले आणि ती तिथून निघून गेली. शेवटी आर्याने या घरात राहायचं नाहीये असं सुद्धा म्हटलं. ‘बिग बॉस’ जवळ तिने विनंती करत मला लवकरात लवकर इथून बाहेर काढा असं म्हटलं आहे. यापूर्वी ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक योगिता चव्हाण हिने सुद्धा मानसिक त्रास होत असल्याचं सांगत ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडायचं आहे असं सांगितलं. योगितानंतर आता आर्यादेखील ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडण्याची विनंती करताना दिसते. तेव्हा वर्षाताई तिला येऊन घट्ट मिठी मारतात आणि त्यावेळी त्याही भावुक झालेल्या दिसतात.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : दिशाचा प्रीतम विरोधातील डाव यशस्वी, अहिल्यादेवींच्या नजरेतून पाडलं आणि…; पारू योग्य तो न्याय मिळवून देणार का?

आर्याच्या या भांडणादरम्यान तिच्या टीममधील मित्रांनी तिच्यासाठी स्टॅन्ड घेतलेला पाहायला मिळाला. अंकिता, पॅडी, धनंजय, सूरज, वर्षा ताई ही सगळीच मंडळी आर्याची बाजू घेत निक्कीला बोलताना दिसले. यानंतर आर्याने अंकिताजवळ मन मोकळं करताना मला इथं राहायचं नाही. प्लिज ‘बिग बॉस’ असं म्हटलं. यावेळी तिने केवळ निक्कीमुळेच नाही तर मला आपल्या ग्रुपमध्येही एकटं वाटत असल्याचं सांगितलं.

Tags: arya and nikki fightbigg boss marathibigg boss marathi 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5

Bigg Boss Marathi : जान्हवीकडून पॅडीचा अपमान, निक्कीची अरेरावी या सगळ्याचा हिशोब लागणार, रितेश देशमुख घेणार शाळा, प्रोमो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.