Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला अगदी दणक्यात सुरुवात झाली. या नवीन पर्वाची सुरुवातच भांडणांनी व वादांनी झाली. निक्की व वर्षाताईंमधले राडे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यानंतर रितेशने निक्कीला सुनावत माफीही मागायला लावली. मात्र घरात पहिल्या दिवसापासून घरातील स्पर्धकांमध्ये वादावादी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकामागून एक स्पर्धक वाद घालत आहेत. घरातील वाद जसे चर्चेत आहेत, तसच घरातील प्रेमकहाण्यादेखील चर्चेत आहेत. अरबाज आणि निक्कीची स्ट्राँग मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ शकतं असा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला. त्यानंतर रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुललेलं दिसून आलं. (Bigg Boss Marathi 5 Dailly Update)
बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले जाऊ लागले. अशातच आता रॅपर आर्यादेखील वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. आर्या अरबाज वैभव हे ‘बिग बॉस’च्या घरात बसलेले असताना ते कोणत्या तरी विषयावर गप्पा मारत आहेत. मात्र यामुळे जान्हवीचा गैरमसज होऊन ती आर्याविषयी निक्की व घन:श्यामकडे बोलत आहे. यावेळी ती आर्यासह अरबाज व वैभव यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. तिच्या या बोलण्यातून आर्याने अरबाज आणि वैभवबरोबर केलेली मैत्री आवडत नसल्याचे दिसून येत आहे.
यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात आर्या, वैभव व आरबाज एकत्र बसलेले असतात. तेव्हा आर्या दोघांना असं म्हणते की, “पहिल्या वेळी इकडे आली तेव्हा माझं योगिताबरोबर चांगलं जमलं. नंतर माझं जान्हवीबरोबर सगळ्यात चांगलं जमलं. जान्हवीमुळे मी निक्कीबरोबर तडजोड करत होते. तिचा स्वभाव मला पटला नाही”. यानंतर ती अरबाजला असं म्हणते की, “तू सुरुवातीपासूनच मला एक सक्षम व खंबीर खेळाडू वाटलास कारण मी तुला पहिलं होतं”. यानंतर ती वैभवला ही असं म्हणते की, “मला माहीत होतं की, हा पण सक्षम खेळाडू आहे. तो इथे सगळं चांगलंच करणार”.
आणखी वाचा – Video : वाढदिवसाला प्राजक्ता माळीकडून मोठी घोषणा, ‘फुलवंती’ चित्रपटातील पहिला लूक, प्रेक्षकही भारावले
यापुढे अरबाज, आर्या व वैभव या तिघांना गप्पा मारताना बघून जान्हवी त्यांच्याबद्दल गार्डन एरियात बसून बोलत असते. यावेळी तिच्याबरोबर निक्की व घन:श्यामही असतात. यावेळी ती त्यांना असं म्हणते की, “इथे मी मूर्ख आहे? मला नाही कळत आहे”. यापुढे ती अरबाज व वैभवबद्दल असं म्हणते की, “तुम्ही हीरो बनण्याचा प्रयत्न करत आहात आणि मी व्हिलन होत आहे. ती (आर्या) त्यांच्याशी हात वगैरे लावून बोलत आहे. ते हसत वगैरे आहेत. ज्या मुलीला घरात कुणीही सदस्य भाव देत नाहीत. सगळ्यांना माहीत आहे की, ती मानसिकरित्या मूर्ख आहे. जिला अजिबातचं अक्कल नाही, तिला हे लोक का समजावत बसले आहेत. इतका वेळ चर्चा करण्यासारखं काय आहे. मला कळतच नाहीये”.