शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तुम्ही निक्कीमुळेच दिसताय”, आर्याला रितेश देशमुखने सुनावलं, म्हणाला, “तुमचा गेम…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 31, 2024 | 6:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Riteish Deshmukh said to Aarya Jadhav that her only because of Nikki Tamboli

Bigg Boss Marathi 5 मध्ये “निक्कीमुळेच तुम्ही दिसताय”, रितेशने आर्याला स्पष्ट शब्दांत सुनावले, नवीन प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील गेल्या आठवड्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’मुळे निक्की तांबोळी ‘ए’ टीममधून बाहेर पडली. त्यानंतर तिचं अरबाजबरोबर कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळालं. या भांडणात अरबाजने तोडफोड केली. यामुळे अरबाजला शिक्षादेखील मिळाली. कॅप्टन्सीच्या शर्यतीमधून अरबाजला बाहेर काढण्यात आलं. एवढं सगळं होऊनही आता निक्की-अरबाजमधील वाद काही प्रमाणात निवळल्याचे पाहायला मिळाले. दोघं पुन्हा एकदा एकत्र आल्याचे दिसले. ‘बिग बॉस’च्या कालच्या भागात अरबाज काचेवर हृदय काढतो. मग निक्की बघायला जाते आणि पुन्हा त्या काचेवर इंग्रजीत लिहिते की, भित्र्या अरबाज पटेलबरोबर कायम आहे. त्यानंतर आर्या अरबाजला सल्ला देत म्हणते की, तुला तिच्यापासून दूर व्हायला पाहिजे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)

‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात ‘बिग बॉस’ने नेमून दिलेल्या जोडीमुळे आर्या अरबाजबरोबरच्या बंधनात अडकली होती. यावेळी ती अनेकदा अरबाजबरोबर आर्याविरुद्ध बोलत होती. याबद्दल आता रितेशने आर्याला कठोर शब्दांत सुनावले आहे . बिग बॉस मराठीच्या भाऊचा धक्काचा  एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. ज्यात रितेश आर्यावर चांगलाच चिडलेला दिसत आहे. या नवीन प्रोमोमध्ये तो आर्याची चांगलीच शाळा घेत आहे. त्याचबरोबर आर्या केवळ निक्कीमुळेचं या घरात दिसते असं रितेश या नवीन प्रोमोमध्ये तिला म्हणत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझा त्रास, राग खोटा आणि…”, रितेश देशमुख अरबाजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार, टीम बीचीही झोप उडणार

या नवीन प्रोमोमध्ये रितेश आर्याला असं म्हणतो की, “तुमचा खेळ निक्कीशिवाय दिसत नाही” यावर आर्या  असं म्हणते की, “निक्की समस्या निर्माण करते आणि आम्ही त्याच्यावर  प्रतिक्रिया देतो” यावर रितेश तिला टोकत असं म्हणतो की, “आम्ही नाही फक्त तुम्ही… तुम्ही फक्त स्वत:बद्दल म्हणा” पुढे आर्या असं म्हणते की “निक्की माझा गेम नाहीये”. यावर रितेश तिला असं उत्तर देतो की, “तुम्हाला असं वाटतं की, निक्की तुमचा गेम नाही. आत्ता तुम्ही दिसताय ते फक्त निक्कीमुळेच. त्यामुळे मला इथे सांगू नका तुम्ही कशा दिसताय”

आणखी वाचा – “लक्ष्याच विंगेत उभं राहून लेकाला…”, वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, म्हणाला, “माझं पहिलं नाटक त्यांनी बघितलं असतं तर…”

दरम्यान, आजच्या भाऊचा धक्क्यावर रितेश आर्यासह सर्वच सदस्यांची शाळा घेणार असल्याचे दिसून येत आहे. अरबाजचं राग व त्रास खोटा असल्यावरून रितेश अरबाजलाही खडेबोल सुनावणार आहे. तर आर्यालाही  तो निक्कीचा गेम म्हणत तिची शाळा घेणार आहे. त्यामुळे आजचा भाऊचा धक्का चांगलाच गाजणार असल्याचे दिसून येत आहे,   

Tags: Aarya Jadhavbigg boss marathi 5nikki tamboliriteish deshmukh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
mohanlal on malyalam film indusrty

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी कलाकारांवर केले घाणेरडे आरोप, मोहनलाल म्हणाले, “बदनाम करु नका आणि…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.