Bigg Boss Marathi 5 update : वर्षा व निक्की यांच्यातील भांडणं काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकामागून एक त्यांच्यात वाद होतचं आहेत. काल (३ ऑगस्ट) रोजी झालेल्या भाऊचा धक्का स्पेशल भागात निक्कीने वर्षाताईंची माफी मागितली होती. मात्र त्याचदिवशी तिने पुन्हा एकदा वर्षाताईंना डिवचलं आहे. अशातच बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये निक्की पुन्हा वर्षाताईंबद्दल असं काहीतरी बोलली आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांचा संताप अजूनच वाढला आहे. बिग बॉसच्या घरात एक खेळ खेळला गेला आणि या खेळात निक्कीने वर्षाताईंचा उल्लेख गुडघ्यात मेंदू असा केला आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (Nikki Tamboli once again target Varsha Usgaonakar)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘भाऊच्या धक्क्या’वर एक खेळ खेळल गेला. यामध्ये रितेश निक्कीला बाजूला ठेवलेला एक्स-रे उचलायला सांगतो. त्या एक्स-रेमध्ये गुडघ्यामध्ये मेंदू दाखवलेला आहे. रितेश, निक्कीला “डॉ. निक्की स्पर्धकांपैकी गुढघ्यात मेंदू कोणाचा आहे?” असं विचारतो. त्यावर निक्की असं म्हणते की “मला हे एका व्यक्तीला द्यायचं आहे पण त्या म्हणतील की, मी अनादर करते. त्यामुळे मला द्यायचंच नाही”. पण रितेश असं म्हणतो की, “हा एक खेळ आहे. अनादर करण्याचा प्रश्न नाही. तुम्ही हा खेळ नीट खेळा”.
हीच संधी साधत निक्की वर्षाताईंचं नाव घेत म्हणते की, “मला असं वाटतं की वर्षाताई. मला त्यांचा अनादर करायचा नाही. पण कधी कधी मॅम एखादा विषय अधिक ताणतात. त्यामुळे असं वाटतं की, त्यांच्या गुढग्यात मेंदू आहे”. त्यामामुळे निक्कीने पुन्हा एकदा शांत झालेल्या त्यांच्या वादाला ठिणगी देण्याचे काम केलं आहे.
दरम्यान, कालच्या भागात रितेशने निक्कीचा चांगलाच समाचार घेतला. मराठी माणसाबद्दल केलेल्या विधानामुळे निक्कीने “आताच्या आता माझ्या मराठी माणसाची तुम्हाला माफी मागायला हवी” असे रितेशने सुनावले आणि त्यानंतर निक्कीने हात जोडून सर्वांची माफी मागितली. यामुळे तिला रडूही आले. त्यानंतर घरात जाऊन तिने पुन्हा एकदा वर्षाताईंची व इतर स्पर्धकांची वैयक्तिकपणे माफी मागितली.