बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 : पालथ्या घड्यावर पाणी, निक्की तांबोळीने पुन्हा वर्षा उसगांवकरांना डिवचलं, म्हणाली “गुडघ्यात मेंदू म्हणजे…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 4, 2024 | 4:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg boss Marathi 5 new promo Riteish deshmukh Nikki Tamboli once again target to varsha usgaonakar

निक्कीने वर्षाताईंना पुन्हा डिवचलं, गुडघ्यात मेंदू म्हणत केला अपमान

Bigg Boss Marathi 5 update : वर्षा व निक्की यांच्यातील भांडणं काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकामागून एक त्यांच्यात वाद होतचं आहेत. काल (३ ऑगस्ट) रोजी झालेल्या भाऊचा धक्का स्पेशल भागात निक्कीने वर्षाताईंची माफी मागितली होती. मात्र त्याचदिवशी तिने पुन्हा एकदा वर्षाताईंना डिवचलं आहे.  अशातच बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये निक्की पुन्हा वर्षाताईंबद्दल असं काहीतरी बोलली आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांचा संताप अजूनच वाढला आहे.  बिग बॉसच्या घरात एक खेळ खेळला गेला आणि या खेळात निक्कीने वर्षाताईंचा उल्लेख गुडघ्यात मेंदू असा केला आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (Nikki Tamboli once again target Varsha Usgaonakar)

‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘भाऊच्या धक्क्या’वर एक खेळ खेळल गेला. यामध्ये रितेश निक्कीला बाजूला ठेवलेला एक्स-रे उचलायला सांगतो. त्या एक्स-रेमध्ये गुडघ्यामध्ये मेंदू दाखवलेला आहे. रितेश, निक्कीला “डॉ. निक्की स्पर्धकांपैकी गुढघ्यात मेंदू कोणाचा आहे?” असं विचारतो. त्यावर निक्की असं म्हणते की “मला हे एका व्यक्तीला द्यायचं आहे पण त्या म्हणतील की, मी अनादर करते. त्यामुळे मला द्यायचंच नाही”. पण रितेश असं म्हणतो की, “हा एक खेळ आहे. अनादर करण्याचा प्रश्न नाही. तुम्ही हा खेळ नीट खेळा”.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Munnabhai MBBS मध्ये ‘सर्किट’ हे पात्रच नव्हतं, स्वत: निर्मात्यांनीच केला खुलासा, नेमका किस्सा काय? जाणून घ्या…

हीच संधी साधत निक्की वर्षाताईंचं नाव घेत म्हणते की, “मला असं वाटतं की वर्षाताई. मला त्यांचा अनादर करायचा नाही. पण कधी कधी मॅम एखादा विषय अधिक ताणतात. त्यामुळे असं वाटतं की, त्यांच्या गुढग्यात मेंदू आहे”. त्यामामुळे निक्कीने पुन्हा एकदा शांत झालेल्या त्यांच्या वादाला ठिणगी देण्याचे काम केलं आहे.

आणखी वाचा – आदेश बांदेकरांमुळे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मिळाले तिचे कष्टाचे पैसे, स्वत: अभिनेत्रीनेच सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “२०-२५ लाख…”

दरम्यान, कालच्या भागात रितेशने निक्कीचा चांगलाच समाचार घेतला. मराठी माणसाबद्दल केलेल्या विधानामुळे निक्कीने “आताच्या आता माझ्या मराठी माणसाची तुम्हाला माफी मागायला हवी” असे रितेशने सुनावले आणि त्यानंतर निक्कीने हात जोडून सर्वांची माफी मागितली. यामुळे तिला रडूही आले. त्यानंतर घरात जाऊन तिने पुन्हा एकदा वर्षाताईंची व इतर स्पर्धकांची वैयक्तिकपणे माफी मागितली.

Tags: bigg boss marathi 5nikki tambolivarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Aamir Khan is going to be retired from acting son junaid revealed

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनयातून होतोय निवृत्त?, आमीर खानच्या लेकाचा मोठा खुलासा, म्हणाला...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.