सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आदेश बांदेकरांमुळे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मिळाले तिचे कष्टाचे पैसे, स्वत: अभिनेत्रीनेच सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “२०-२५ लाख…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 4, 2024 | 4:22 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aadesh Bandekar helped Marathi actress Niyati Rajwade to get her overdue money from producer

आदेश बांदेकरांमुळे नियती राजवाडेला मिळाले तिचे थकलेले पैसे, जाणून घ्या...

Aadesh Bandekar helped : नाटक, मालिका व काही चिटपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे नियती राजवाडे. नियती यांनी केवळ मालिकांमध्येच नव्हे तर रिअ‍ॅलिटी शोमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. नियती यांनी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘कॉमेडी एक्सप्रेस’ तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या मराठी विनोदी कार्यक्रमांमधूनही प्रेक्षकांना हसवण्याचे काम केलं आहे. गेल्या दशकभरापासून नियती राजवाडे मराठी मनोरंजन सृष्टीत कार्यरत असल्या तरी त्यांचा या सिनेसृष्टीतला संघर्ष हा अजूनही संपलेला नाही. आजही त्यांना एखादी भूमिका मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्या याच संघर्षमय प्रवासाबद्दल नियती यांनी ‘इट्स मज्जा’शी खास संवाद साधला. नियती यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या खास कार्यक्रमात हजेरी लावली होती. (Aadesh Bandekar helped Niyati Rajwade)

‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात नियती यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल मनमुराद संवाद साधला. यावेळी त्यांना इंडस्ट्रीतल्या वाईट अनुभवाबद्दल विचारण्यात आले. याचे उत्तर देत त्यांनी एक किस्सा सांगितला. एका निर्मात्याने नियती यांचे काही पैसे अडकवले होते. जे आदेश बांदेकरांच्या मदतीने त्यांना मिळाले. याबद्दल नियती यांनी असं म्हटलं की, “लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन आणि आम्ही पाच ते सहा कलाकार होतो. आम्हा सर्वांचे पैसे थकले होते. मालिका सुरु झाल्याच्या तीन महिन्यांनी ती मालिका बंद पडली. पण ती एक उत्तम मालिका होती, आली असती तर खूप चांगली चालली असती. त्याचे शूटिंग आम्ही तीन-चार महीने आधीपासून सुरु केलं होतं. त्यामुळे त्याचे पैसे खूप झाले होते”.

आणखी वाचा – Munnabhai MBBS मध्ये ‘सर्किट’ हे पात्रच नव्हतं, स्वत: निर्मात्यांनीच केला खुलासा, नेमका किस्सा काय? जाणून घ्या…

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “त्या मालिकेचा निर्माता हा खूप नावाजलेला होता. मालिका अचानक बंद झाल्यामुळे निर्मिती संस्थेला प्रॉब्लेम होऊ शकतो हे मी समजू शकते. पण आम्हाला दिसत आहे की, तुम्ही २०-२५ लाखांची गाडी घेऊन जगात फिरत आहे. मग आम्ही असं म्हणू का की, आमच्या पैशांनी तुम्ही मज्जा मारताय. त्या मालिकेसंदर्भातील ते पैसे मिळवण्यासाठी आम्ही अनेक संघटनांना भेटलो. यादरम्यानचं आम्ही आदेश बांदेकरांना भेटलो”.

आणखी वाचा – निखिल पटेलविरुद्ध दलजित कौरची मुंबई पोलिसांत धाव, नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल, म्हणाली, “एका महिलेला या देशात…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आदेश सरांचे नाव घ्यायला मला भीती वाटणार नाही, कारण त्यांनी आमचे पैसे मिळवून दिले. आदेश सरांनी आम्हाला त्या निर्मात्याला सवलत वगैरे द्यायची आहे का म्हणून विचारलं. यावर आम्ही त्यांना नाही म्हटलं. कारण आम्ही आमच्या कष्टाचे पैसे मागत होतो आणि या काळात काही समस्या असती तर त्या निर्मात्याने आम्हाला एकत्र बसवून तसं सांगायला पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी आम्ही काही सवलत वगैरे दिली नाही आणि अश्या पद्धतीने आम्हाला आमचे पैसे मिळाले. पण त्या काळात खूप मनस्ताप झाला”.        

Tags: Aadesh Bandekarmarathi entertainment newsNiyati Rajwade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Bigg boss Marathi 5 new promo Riteish deshmukh Nikki Tamboli once again target to varsha usgaonakar

Bigg Boss Marathi 5 : पालथ्या घड्यावर पाणी, निक्की तांबोळीने पुन्हा वर्षा उसगांवकरांना डिवचलं, म्हणाली “गुडघ्यात मेंदू म्हणजे...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.