Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व हे पहिल्या दिवसापासूनच गाजताना दिसत आहे. पहिल्याच आठवड्यात झालेली मोठी भांडणे ते घरात झालेले दोन गट, यापासून घरात नुकतीच झालेली वाइल्ड कार्ड एन्ट्री आणि त्यानंतर आर्याने निक्कीला लगावलेली थप्पड. यामुळे या शोची सातत्याने चर्चा होताना दिसते. प्रेक्षक, कलाकार आणि आधीच्या पर्वातील स्पर्धक सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या खेळाबद्दल आणि स्पर्धकांच्या वागण्याबद्दल व्यक्त होताना दिसतात. बिग बॉस मराठीची उत्कंठता दिवसागणिक वाढत आहे. अशातच नुकत्याच आलेल्या नवीन प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात पॅडी चक्रव्यूह खोलीत गेल्याचे पाहायला मिळत आहे आणि यात त्यांना अंकिता व डीपी म्हणजेच धनंजय पोवार यांनी पॅडी यांच्याबद्दल केलेली चुगली दाखवणार आहेत आणि हे बघून त्यांना मोठा धक्का बसल्याचेदेखील या नवीन प्रोमोमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पॅडी असं म्हणत आहेत की, “त्यांनी कदाचित प्रत्येक गोष्टीमध्ये आपला स्वार्थ बघितला असेल. पण घराबाहेर गेल्यावर त्यांना कळेल की त्यावेळी आपण केलेली सर्व वक्तव्ये चुकीची होती. पॅडीने कधीच कोणती गोष्ट स्वार्थाने केली नाही. त्याच्यामध्ये नि:स्वार्थ भावना असते. धन्यवाद”.
आणखी वाचा – आत्महत्या की अपघात?, मलायका अरोराच्या वडिलांच्या मृत्यूबाबत अनेक खुलासे, २४ तासात नक्की काय काय घडलं?
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भाऊचा धक्कामध्ये अनेक विशेष गोष्टी होणार आहेत. आर्याबद्दलचा निर्णय असो वा संग्रामच्या खेळाबद्दलची प्रतिक्रिया ही आजच्या भाऊचा धक्कामध्ये पाहायला मिळणार आहे. अशातच चक्रव्यूह खोलीत पॅडी यांना अंकीटा व डीपी यांच्याबद्दलची चुगली ऐकवली जाणार आहे. आता ही चुगली नेमकी काय आहे? यामुळे पॅडी यांना अंकिता व डीपी यांच्याबद्दल काही गैरसमज निर्माण होणार का? आणि या गैरसमजातून त्यांच्या ग्रुपमध्ये काही बदल होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या आठवड्यात ‘जादुई दिवा’ या टास्कमध्ये निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर आणि आर्या जाधव हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता यांच्यापैकी घरात कोण राहणार आणि कोणता सदस्य या घराचा निरोप घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.