शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “पॅनिक अटॅकमधून लगेच बरी कशी झाली?”, जान्हवीचं वागणं खोटं असल्याचा सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा दावा, म्हणाला, “लगेच मूड बदलणं…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 12, 2024 | 12:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Janhvi Killekar dramatic behavior Surekha Kudchi shared a critical post

Bigg Boss Marathi 5 मधील जान्हवी किल्लेकरच्या वागण्यावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांची खोचक पोस्ट

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच घरातील सदस्यांकडून वर्षाताईंचा वारंवार अपमान केला जात आहे. पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकर यांच्या कारकिर्दीचा, वयाचा मान न राखता त्यांना नको नको ते बोलली होती. त्यामुळे रितेशने ‘भाऊच्या धक्क्या’वर निक्कीची चांगलीच खरडपट्टी काढली. यांशीबाय तिला माफीही मागायला लावली होती. निक्की नंतर तिची मैत्रीण जान्हवी किल्लेकरने गेल्या आठडव्यात त्यांचा अपमान केला. जान्हवी आणि वर्षा उसगांवकर यांच्यात वादविवाद झाला. जान्हवी आर्याला निर्लज्ज म्हणाली. त्यावर वर्षाताई ‘निर्लज्जम समर्पयामी’ असं म्हणाल्या. हे ऐकताच जान्हवी, ‘ताई मी तुमचा पहिल्या दिवसापासूनच रिस्पेक्ट करत आलीये. माझ्या नादी लागू नका. तुमची घाणेरडी ऍक्टिंग मला दाखवू नका’ असं म्हणाली. यावर अनेकांनी संतप्त पोस्ट शेअर केल्या होत्या. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

 ‘बिग बॉस मराठी’ च्या माजी स्पर्धक सुरेखा कुडची यांनीही याबद्दल अआपला राग व्यक्त केला होता. अशातच आता त्यांनी नुकत्याच झालेल्या भाऊच धक्कामध्ये जान्हवीला भोवळ आली होती. यावर आपलं मतं मांडलं आहे. सुरेखा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे जान्हवीच्या वागण्यावर आपलं मत मांडलं असून त्यांनी तिच्यावर खोचक पोस्टही शेअर केली आहे. हसावं की रडावं या शीर्षकाखाली त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुरेखा यांनी असं म्हटलं आहे की, “रितेशने आज एकीला झापलं. वर्षा उसगांवकरांचा अपमान केला तेव्हा डोळ्यातून दोन टिपूसही ओघळले नाहीत. पण वाईट वाटल्याचा अभिनय भारी होता. थोड्या वेळाने अक्षय कुमार आला तेव्हा अचानक मस्करीचा मूड. त्याचवेळी जेव्हा चुगली सांगितली गेली तेव्हा रितेशलाही खोटं पाडण्याचा प्रयत्न केला गेला”.

View this post on Instagram

A post shared by Surekha Kudchi (@surekha_kudachi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात नवीन पाहुण्याची एण्ट्री होणार, कोण असणार ‘ती’ व्यक्ती? गाणं वाजलं अन्…

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “यावेळी आपल्या भाऊने भाऊचा धक्का दिला तो मला जाम आवडला. पण त्यानंतरचा मूड आणि चेहऱ्यावरचा जो रंग उडाला होता तो अरारा. ब्रेकमध्ये रडून झालं आणि अचानक पॅनिक अटॅकही आला. कारण निक्कीला समजलं तर… आणि थोड्या वेळाने परत डान्सही केला. हा संपूर्ण  एपिसोड अर्ध्या तासात शूट झाला जातो, इतक्यात मूड बदलणे सोपं नाही बरं का? प्रश्न इतकाच आहे की यातलं खरं काय?”

आणखी वाचा – पॅडीचे कपडे फेकून दिले, अंकिताला जोरात बेडवर ढकललं आणि…; Bigg Boss Marathi च्या घरात निक्कीची दादागिरी

दरम्यान, सुरेखा यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून अनेकांनी सुरेखा यांच्या या मताशी सहमती दाखवली आहे. त्याचबरोबर जान्हवी नाटकं करत आहे तिला ऑस्कर दिला पाहिजे, लोक बघत आहेत” अशा अनेक कमेंट्सद्वारे अनेकांनी जान्हवीवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.          

Tags: Boss Marathi 5janhavi killekarsurekha kudachi on bigg boss marathi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
bigg boss marathi season 5 vaibhav chavan and paddy kamble fight

Bigg Boss Marathi : "तुम्हीच किडे केले", निक्कीचा बेशिस्तपणा तरीही वैभवला दिसली पॅडीचीच चूक, म्हणाला, "तुम्ही दहावेळा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.