Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये सेलिब्रिटींपासून नेत्यांपर्यंत आणि गायकांपासून सोशल मीडिया एन्फ्लुएंसर्स सामील झाले आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात एकापेक्षा एक सदस्य पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळीची वर्षा उसगांवकरबरोबरचा राडा, नॉमिनेशन टास्क आणि पहिलं एलिमिनेशनदेखील पाहायला मिळालं, ज्यामध्ये पुरुषोत्तम दादा पाटील, शोमधून बाहेर पडणारे पहिले स्पर्धक ठरले. दुसरीकडे, ‘बिग बॉस मराठी ५’चा दुसरा आठवडा देखील धमाकेदार नोटवर सुरू झाला ज्यामध्ये स्पर्धक ‘बिग बॉस’ करंसीसाठी आणि कॅप्टन्सीसाठीदेखील भांडताना दिसले. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
अशातच आता येत्या आठडव्यात या घरात नवीन पाहुणा येणार आहे. कालच्या ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेशने याबद्दलची घोषणा केली. ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेशने सर्व स्पर्धकांची शाळा घेतली, एकामागून एक धक्केही दिले आणि सर्वात मोठा धक्का दिला तो म्हणजे या घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याचा. बिग बॉसच्या दुसऱ्या आठवड्यात सहा स्पर्धक नॉमिनेट झाले होते. मात्र कुणीच घराबाहेर गेलं नाही. पण तरीही या स्पर्धकांवर पुढील आठडव्यासाठी नॉमिनेशनची टांगती ताळवार कायम राहणार आहे. त्याचबरोबर घरात नवीबन पाहुणाही येणार आहे.
आणखी वाचा – पॅडीचे कपडे फेकून दिले, अंकिताला जोरात बेडवर ढकललं आणि…; Bigg Boss Marathi च्या घरात निक्कीची दादागिरी
याबद्दल ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेशने असं म्हटलं की, “या घरात तुमच्या भेटीला एक पाहुणा येणार आहे. जो माझा खूप खास आहे आणि ‘बिग बॉस’चादेखील. आता त्या पाहुण्याला तुम्ही कसं वागवत आहात. त्याचे कसे लाड करत आहात. हे मीही बघणार आहे आणि ‘बिग बॉस’ही त्यामुळे सर्वांना आतापासूनचं ऑल द बेस्ट”. रितेशच्या या म्हणण्यानंतर घरातील सर्व स्पर्धकांचा रंगचं उडाला आहे. त्यामुळे आता या घरात येणारा नवीन पाहुणा नक्की कोण आहे? या स्पर्धक वाईल्ड कार्ड स्पर्धक असेल का? त्याच्या येण्याने घरात काय उलथापालथ होणार आहे? हे प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याचसाठी प्रेक्षक आतुर आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर कालच्या भागात खिलाडी अक्षय कुमारने हजेरी लावली होती. अक्षय कुमारच्या येण्याने ‘भाऊच्या धक्क्या’ला हाऊसफुल्लचा बोर्ड लागला. आता नवा आठवडा सुरू झाला असून नव्या आठवड्यातही सदस्य फुल ऑन कल्ला करताना दिसून येणार आहेत. तसंच ”बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात एकही सदस्य घराबाहेर पडला नाही. त्यामुळे आता तिसऱ्या आठवड्यात सदस्य कसा कल्ला करणार हे पाहावे लागेल.?