Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गुरुवारी ‘फॅमिली स्पेशल’ एपिसोड सुरू झालेला आहे. ‘कलर्स मराठी’ने अभिजीत सावंतच्या कुटुंबियांचा व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी सर्व प्रेक्षकांना दिली. पहिल्यांदा, वर्षा उसगांवकर यांची बहीण मनीषा येतात आणि त्या घरातील सर्व सदस्यांची भेट घेतात. तिला पाहून वर्षाही खूप भावुक होतात. मग अभिजीतची पत्नी आणि त्याच्या मुली भेटायला येतात. त. यावेळी “मला त्याच्यावर २०० टक्के विश्वास आहे, तू कोणाचाही विचार करू नकोस, चांगला खेळ, संपूर्ण जनता तुझ्या पाठीशी आहे” असं शिल्पा म्हणजेच अभिजीतची पत्नी त्याला सांगते. तसंच मध्यंतरी बी टीमने अभिजीतबद्दल केलेल्या वागणुकीवर ती आपलं मत मांडते. (Abhijeet Sawant Wife On Team B)
अभिजीतची बायको डीपी यांना भेटायला जाते तेव्हा डीपी तिला असं म्हणतात की, “जरा त्याचे कान ओढा”. यावर अभिजीतची बायको असं म्हणते की, “त्याचे कान ओढायचे गरज नाही, तो जबरदस्त खेळत आहे. मला त्याच्यावर २०० टक्के विश्वास आहे. तो काहीच चुकीचे करु शकत नाही. तो त्याचा खेळ उत्तम खेळत आहे. कुणी कितीही काहीही बोलूदेत. तो माणूस म्हणून कसा आहेस हे प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना माहीत आहे. तुझा गेम अतिशय छान आहे. तसंच खेळत रहा, महाराष्ट्राची जनता तुला पाठींबा देत आहे. त्यामुळे तुझे मित्र आणि सर्व कुटुंबियांना तुझा गर्व आहे. लक्षात ठेव… तू सुद्धा इथे गेम खेळायला आला आहेस. तुला जे चुकीचे वाटेल तिथे तू ते बोल मग समोर कुणीही असुदेत. बाहेर तू अतिशय चांगला दिसत आहेस”.
आणखी वाचा – 27 September Horoscope : शुभयोगामुळे ‘या’ पाच राशींना होणार धनलाभ, नोकरी व व्यवसायात होणार नफा, जाणून घ्या…
पुढे ‘बिग बॉस’ निक्की व अंकिताला मोकळं करतात. तेव्हा अंकिता अभिजीतच्या बायकोला असं म्हणते की, “मी कुठे चुकत आहे का? मी त्याला कधीकधी ओरडते. हो किंवा नाही हे सांग फक्त”. यावर अभिजीतची बायको अंकिताला म्हणते की, “खरं सांगू, तू चुकत आहेस. प्रत्येकजण आपला हळवा कोपरा शोधत आहे. त्यानेदेखील तेच केलं. त्याला माहीत आहे त्याचं लग्न झालं आहे आणि त्याला दोन मुली आहेत. बाहेर पण कुणी काही चुकीचे दिसत नाही आणि तोसुद्धा काहीच चुकीचं करत नाहीय. तो ज्या क्षेत्रात आहे तिथे त्याच्या हजारो मैत्रीणी आहेत. त्यामुळे तो चुकीचे करत नाहीय आणि मला त्याच्यावर २०० टक्के विश्वास आहे”.
यापुढे अभिजीतची पत्नी ‘टीम बी’बद्दल असं म्हणते की, “मला दु:ख या गोष्टीचे आहे की, त्याने ‘बी टीम’साठी अनेकदा खूप काही केलं. पण कुणीच त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. अभिजीत खूप कमी मित्र बनवतो आणि त्याने इथे मित्र बनवले. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यावर कुणी विश्वास ठेवला नाही, याचे मला वाईट वाटले. पण नंतर सगळं ठीक झालं आणि आता मला आनंद आहे की, त्याने इथे तुमच्यासारखे चांगले मित्र बनवले आहेत”.