शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : मनाचा मोठेपणा! सूरजने टीमला दिलं कॅप्टन्सी मिळाल्याचं संपूर्ण श्रेय, रितेश देशमुखही भारावला, म्हणाला, “योग्य ती भूमिका…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 7, 2024 | 1:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 host Riteish Deshmukh praises Suraj Chavan for becoming the new captain

Bigg Boss Marathi 5 चा नवीन कॅप्टन झाल्यानिमित्त रितेश देशमुखनेही केलं सूरजचं कौतुक, म्हणाला, “योग्य भूमिका घ्या”

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या ५ सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार निवडण्यासाठी बसमध्ये बसण्याचा टास्क खेळवण्यात आला. त्यानंतर वर्षा उसगांवकर, अंकिता प्रभू वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे सदस्य कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी पात्र ठरतात. यामध्ये सूरज चव्हाणला या घरचा नवीन कॅप्टन होण्याचा बहुमान मिळतो. शुक्रवारच्या भागात कॅप्टन्सीचे उमेदवार असलेल्या स्पर्धकांसाठी एक टास्क दिला जातो, ज्यातून घरातील सदस्यांना कॅप्टन्सीच्या चार उमेदवारांपैकी एकाची कॅप्टन म्हणून निवड करायची असते. यात सगळे सदस्य ठरवून सूरजला घरचा नवीन कॅप्टन बनवतात. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने ‘झापुक झुपूक’ गेम करत बाजी मारली आणि तो आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केल्याचंही पाहायला मिळालं. सूरजच्या या कॅप्टन्सीचा सर्वांनाच आनंद झाला. त्यामुळे घरातील सदस्य “हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज भाऊ जैसा हो”, अशा घोषणा देताना दिसत आहे.  घरातील सदस्यांबरोबरच सामान्य प्रेक्षक व अनेक कलाकार मंडळींनीदेखील त्याच्या कॅप्टन्सीनिमित्त आनंद व्यक्त केला आहे. सूरजच्या अनेक चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे नवीन कॅप्टन झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “सदस्यांबरोबर विश्वासघात…”, अरबाजच्या बदलेल्या वागणुकीबद्दल अभिजीतकडून कानटोचणी, म्हणाला, “पलटी मारली…”

अशातच शोचा होस्ट रितेश देशमुखनेदेखील सूरज कॅप्टन झाल्यानिमित्त त्याचं कौतुक केलं आहे. आजच्या भाऊचा धक्कावर रितेश सूरजला असं म्हणतो की, “अभिनंदन सूरज, खरंतर, अभिनंदन कॅप्टन सूरज. शेवटी तुमची इच्छा पूर्ण झाली”. यावर सूरज असं म्हणतो की, “गणपती बाप्पाने माझी इच्छा पूर्ण झाली”. यानंतर पॅडी मस्करी करत “आम्ही काहीच केलं नाही का?” असं म्हणतात. यावर सूरज असं म्हणतो की, “असं काही नाही. मी कॅप्टन व्हावं म्हणून माझ्या टीमनेही खूप प्रयत्न केले”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या, आर्याचा काढला बाप, प्रेक्षकांनी संस्करांवर निर्माण केलं प्रश्नचिन्ह

यापुढे रितेश सूरजला त्याच्या कॅप्टन्सीबद्दलच्या भावना विचारतो. यावर सूरज असं म्हणतो की, “माझ्या टीमने मला खूप पाठींबा दिला आणि मला ताकद दिली की तू हे करु शकतोस आणि मी ते केलं”. यावर रितेश सूरजला धीर देत असं म्हणतो की, “या आठवड्यात जसं बोलत होतात. खेळत होतात तसंच बोलत रहा आणि काम करत रहा. योग्य त्या गोष्टींवर भूमिका घ्या. कॅप्टन म्हणजे जबाबदारी आहे”.    

Tags: bigg boss marathi 5riteish deshmukhSuraj Chavan New Captain
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 Daily Updates riteish deshmukh on nikki tamboli

Bigg Boss Marathi : “तुम्हाला माज आलाय आणि…”, रितेश देशमुखने निक्कीला तोंडावरच फटकारलं, म्हणाला, “हवं ते बोलायचं…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.