‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्याने सोशल मीडियावर चांगलीच रंगत आणलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’मध्ये पाचवा सीझन सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात टीम ए व टीम बी मधील राडा पाहायला मिळत आहे. तर यंदाच्या पर्वात निक्की तांबोळीची अधिक चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. निक्कीचा अरेरावीपणा ‘बिग बॉसच्या घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांना खटकू लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या आठवड्यात निक्कीने विशेष त्रागा केलेला पाहायला मिळाला. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
निक्कीने घरातील कामं करण्यास स्पष्ट नकार दिला होता. किचनशिवाय कोणतीही ड्युटी करणार नाही या मतावर निक्की ठाम होती.तोंडात येईल ते बोलत सुटत निक्की तांबोळीने घरातील सदस्यांना खडेबोल सुनावले. यावेळी स्पर्धकांच्या वडिलांवरुनही निक्कीने भाष्य केलं. स्पर्धकांचा बाप काढणं हे कितपत योग्य आहे असे म्हणत निक्कीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. यावर आता रितेश देशमुखने निक्कीची शाळा घेतलेली पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश यांनी निक्कीला वेगळ्या ठिकाणी बसायला लावलं. रितेश निक्कीला म्हणत आहे की, “निक्की, कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही ही अशा प्रकारची दादागिरी मी खपवून घेणार नाही. इथून पुढे संपूर्ण सीझनभर तुम्ही कधीही घराच्या कॅप्टन होणार नाही”. अर्थात भाऊच्या धक्क्यावर निक्कीला आणखी एक शिक्षा देणार असल्याचं देखील रितेशने यावेळी सांगितलं.
यानंतर समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेशने निक्कीला तिची जागा दाखवलेली पाहायला मिळत आहे. रितेशने निक्कीला सुनावत असं म्हटलं की, “निक्की ही आहे तुमची जागा. निक्की मी गेल्या आठवड्यात तुमचं कौतुक केलं. पण हे कौतुक मनात ठेवायचं असतं कारण कौतुक जेव्हा डोक्यात जातं ना तेव्हा त्याची हवा होते. आणि एकदा डोक्यात हवा गेली की आपला स्वतःवरचा ताबा सुटतो. आपल्यात माज येतो आणि मग आपण वाटेल तसे बोलायला लागतो, वाटेल तसे वागायला लागतो. आणि या आठवड्यात आपण तेच केलं”.