शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान नाही आणि…”, सूरज चव्हाणबाबत अंकिता वालावलकरचं वक्तव्य, म्हणाली, “त्याची कुवत…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 8, 2024 | 10:28 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 grand finale Konkan Hearted Girl Ankita Walawalkar talked about Suraj Chavan.

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेनंतर अंकिता वालावलकरने सूरजबद्दल मांडलं मत

Bigg Boss Marathi 5 : कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकरच्या ‘बिग बॉस मराठी’मधील एन्ट्रीमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. सुरुवातीला अंकिताला खेळाचा अंदाज आला नसल्याचंही पाहायला मिळालं. पण त्यानंतर जसा तिला खेळ समजला तसं तिने ‘बिग बॉस’च्या घरातलं तिचं स्थान भक्कम केलं. पण अखेर ग्रँड फिनालेमध्ये येऊन अखेरला तिचा या घरातील प्रवास आता संपला. अंकिता ही टॉप ६ मध्ये जाणारी शेवटची स्पर्धक होती. वर्षा उसगांवकर आणि अंकितामध्ये ग्रँड फिनालेची शर्यत रंगली होती. पण आता ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन तिचा हा प्रवास आता संपला. (Bigg Boss Marathi 5 Ankita Walawalkar)

त्यानंतर घरात अंकिता, धनंजय, निक्की, जान्हवी, सूरज व अभिजीत या सहा जणांमध्ये अंतिम लढत झाली आणि या लढतीत एकेक जण बाहेर पडत टॉप २ मध्ये सूरज व अभिजीत यांनी स्थान मिळवले.  सूरज व अभिजीत या दोघांमध्ये अखेर सूरजने विजेतेपद पटकावले. ‘बिग बॉस’च्या घरात सूरज, अंकिता आणि पॅडी यांची चांगली मैत्री होती. पॅडी व अंकिता यांनी वेळोवेळी सूरजला गेम शिकवला होता. तसंच त्याने कसं वागावे कसं बोलावे याबद्दलही सांगितले. अशातच त्याच्या विजयावरही अंकिताने तिचं मत मांडलं आहे.

आणखी वाचा – “हिरोईन बनून बाहेर आले आणि…”, जान्हवी किल्लेकरची पहिलीची प्रतिक्रिया, म्हणाली, “महाराष्ट्राला माझा राग पण…”

इट्स मज्जालं दिलेल्या मुलाखतीत अंकिता असं म्हणाली की, “बाहेरून आपण हा शो बघतो तेव्हा साहजिक आहे की, एखाद्याबद्दल आपल्याला सहानूभूती निर्माण होते आणि महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांना सहानूभूती वाटत होती. पण आपण सहानूभूती पोटी एखाद्याला बरीच मोठी गोष्ट देऊन जातो आणि तीच गोष्ट महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी सूरजला दिली आहे. ज्याचा आपल्याला मान ठेवला पाहिजे. मीसुद्धा ठेवते. असं नाही की तो यासाठी पात्र नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला जे दिलं आहे ते त्याला छानपणे सांभाळण्यासाठी आम्ही कशाप्रकारे मदत करु याकडे आमचं लक्ष आहे.

आणखी वाचा – “बायकोने साडी नेसून, डोक्यावर पदर घेऊन असावं आणि…” सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोकडून अपेक्षा, म्हणाला, “घास भरवत…”

यापुढे अंकिता असं म्हणाली की, “त्याला जे मिळालं आहे ते पेलवलं पाहिजे, कारण त्याच्याकडे ती कुवत नाही. त्याला मी जेवढं ओळखते त्यावरुन त्याला पैशांची ओळख नाही आणि त्याला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान नाही. याचाच फायदा घेणारी अनेक लोक त्याच्या आजूबाजूला आहेत. त्याने आतापर्यंत केलेल्या कामाचे पैसेही त्याच्याकडे नाहीत. ‘बिग बॉस’मध्ये यायच्या आधी त्याचं बँक अकाऊंट उघडलं गेलं. त्यामुळे आता त्याला हे सगळं मॅनेज करता येणं हा त्याच्यासाठी टास्क आहे”.

Tags: Ankita Walawalkar On Suraj Chavanbigg boss marathi 5Konkan Hearted Girl Ankita Walawalkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Ankita Walavalkar On Relationship

"तोही याच इंडस्ट्रीमधला आणि…", होणाऱ्या नवऱ्याबाबत अंकिता वालावलकरने अखेर सांगितलं, म्हणाली, "लवकरच लग्न…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.