शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 : “बाप मेला तेव्हा गोट्या खेळत होतो आणि…”, वडिलांचं निधन होऊनही रडला नाही सूरज चव्हाण, म्हणाला, “गावातल्यांनी नावं ठेवली…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 2, 2024 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Suraj Chavan told the situation after his father left

बिग बॉस मराठीच्या सूरज चव्हाणने सांगितली कहाणी, वडील गेल्यानंतरचा वाईट काळ कसा होता?

Bigg Boss Marathi 5 Update : संघर्ष हा कधी कुणाला चुकलेला नाही. पण या संघर्षावर मात करत, आपल्या आयुष्यातील दु:ख विसरुन इतरांच्या चेहऱ्यावर जो हास्य आणण्याचे काम करतो आणि यशाची शिखरे गाठतो तोच खरा कलाकार. असाच एक अतरंगी कलाकार म्हणजे सुरज चव्हाण. आपल्या अतरंगी, विनोदी धाटणीच्या व्हिडीओमुळे सूरज चव्हाण अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. मोबाइलवर व्हिडीओ करणाऱ्या सुरजने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. आपल्या खास शैलीने व्हिडीओ करणारा सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सूरज चव्हाणच्या ‘बिग बॉस’च्या घरातील एण्ट्रीमुळे अनेकांना आश्चर्य वाटले. पण त्याचा इथपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक कठीण परिस्थितीवर मात करत तो इथपर्यंत आला आहे. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)

बारामती तालुक्‍यातील मोडवे गावचा रहिवासी असलेल्या सूरज चव्हाणचे आयुष्य खूपच खडतर आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. आई-वडील गेल्यानंतर त्याच्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. आई-वडील गेल्यानंतरच्या त्याच्या याच परिस्थितीबद्दल स्वत: सूरजने सांगितलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या वडिलांच्या निधनाबद्दल व त्याला आईची आठवण येत असल्याचे म्हटलं आहे. यावेळी सूरजला अश्रुही अनावर झाले.

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनेच फसवलं, दुसऱ्याच मुलीबरोबर पकडलं अन्…; म्हणाली, “माझ्या आयुष्यामध्ये…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “बाप मेला तेव्हा मी गोट्या खेळत होतो आणि कुणीतरी येऊन सांगितलं की, तुझा आप्पा गेला. तेव्हा पळत पळत घेरी गेलो. वडील गेलेले असूनही मला रडायलाच आलं नाही. माझ्या डोळ्यांतून तेव्हा पाणीचं आलं नाही. त्यामुळे मला गाववाल्यांनी नावं ठेवली”. यापुढे सुरजने त्याच्या वडिलांबद्दल असं म्हटलं की, “माझ्या आप्पांनी सर्वांना सढळ हाताने मदत केली. दारावर कुणीही गरीब माणूस आला तर जेवत्या ताटावरुन उठून मदत केली. स्वत: उपाशी राहून तो त्याला जेवायला देत असे. असा माझा बाप होता. याचं मला आता वाईट वाटतं आहे”.

आणखी वाचा – हनिमूनवरुन घरी परतले अधिपती-अक्षरा, भूवनेश्वरीला घराबाहेर काढल्याचे सत्य समजताच वडिलांची कॉलर पकडली अन्…

यापुढे सूरजने यामुळे मला आता काही खाऊ-पिऊ वाटत नसल्याचे म्हटलं आहे. तसंच मला आईची आठवण येत असल्याचेही त्याने सांगितलं. दरम्यान, गरीबी व हलाखीच्या परिस्थितीमुळे सुरजने त्याचं शालेय शिक्षणही पूर्ण केलं नाही. त्याने फक्त आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मोलमजुरी करत घराची परिस्थिती सांभाळली.   

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Marathi NewsSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
dalljiet kaur reacts on husband nikhil patel

नवऱ्याने गर्लफ्रेंडला मिठी मारताच भडकली दलजीत कौर, पोस्टही केली शेअर, म्हणाला, "रडू थांबतच नाही कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.