‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं आणि तो चांगलाच लोकप्रिय झाला. ‘बिग बॉस मराठी’चे विजेतेपद जिंकल्यानंतर त्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. त्याच्या विजयाचा आनंद सर्वत्र साजरा करण्यात आला. डीजे लावून, मिरवणूक काढून त्याच्या विजयाचा जल्लोष सर्वांनी साजरा केला. अशातच आज सूरज चव्हाणचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सूरजच्या वाढदिवसानिमित्त त्याला लाडक्या पॅडीदादांनी म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. पॅडी यांनी सूरजसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सूरजला खास शुभेच्छा दिल्या आहेत. (Paddy Kamble wished Suraj Chavan)
पॅडी यांनी सूरजबरोबरचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “आपल्या आयुष्यात अनेक माणसं येत जात असतात परंतु काही माणसं अशी येतात की ती कायमची मनात घर करून जातात. ‘सूरज चव्हाण’ हे नाव माझ्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं होऊन जाईल याचा मी स्वप्नातसुद्धा कधी विचार केला नव्हता. ‘बिग बॉस’च्या घरात असताना तुझ्याबरोबर जे काही थोडे फार क्षण मला घालवता आले ते मी कधीही विसरू शकत नाही. आपलं शिक्षण किती? आपली आर्थिक परिस्थिती काय? आपण कलाकार म्हणून कसे आहात? आपण चार चौघात कसे राहतो, कसे वागतो? याचा आपण रोजच्या जगण्यात किती तरी वेळा विचार करत असतो. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अक्षरशः फाट्यावर मारून तू फक्त तुझ्यातल्या ‘माणूसकीने’ संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकतो”.
आणखी वाचा – गप्पा सुरु असतानाच ओरीने रणवीर सिंहचा ओढला चष्मा, अभिनेत्याचा चेहऱ्याचा बदलला रंग, केलं असं काही की…
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “तुझ्यातल्या माणूसपणाचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही. तुला आज यशाच्या शिखरावर पाहून उर अभिमानाने भरून येतो. तू कमावलेलं हे यश आणि तू जिंकलेलं महाराष्ट्रातील प्रत्येक मन हे कायम तुझ्याबरोबर राहो, याच तुझ्या वाढदिवसानिमित्तनिम्मित तुला शुभेच्छा”. बिग बॉसच्या घरात सूरज व पॅडी यांचा खास बॉण्ड पाहायला मिळाला होता. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर पॅडी यांनी त्याचे पालकत्व घेतल्याचे सांगितलं होतं. अशातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, पॅडी व सूरज यांच्या या व्हिडीओला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “पंढरीनाथ दादा + सूरज = खरी मैत्री”, “देव माणूस पॅडी दादा”, “एक निस्वार्थ प्रेम”, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.