शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 नंतर निक्की तांबोळीचा नवा शो, सोबतीला उषा नाडकर्णीही असणार, कधी व कुठे पाहता येणार?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 22, 2024 | 4:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Nikki Tamboli will be seen in Celebrity MasterChef show with Usha Nadkarni

Bigg Boss Marathi 5 नंतर निक्की तांबोळीचा नवा शो, सोबतीला उषा नाडकर्णीही असणार

‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपले असले तरी या शोची आणि शोमधील कलाकारांची चर्चा मात्र अजून थांबलेली नाही. यंदाचे ‘बिग बॉस’चे पर्व अनेक कारणांनी गाजले त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे अभिनेत्री निक्की तांबोळी.  निक्की तांबोळी हिचा ‘बिग बॉस’मधील प्रवास वेगवेगळ्या छटांचा राहिला. पण तिचं बेधडकपणे बोलणं यामुळे ती चर्चेत राहिले. निक्की तिच्या भांडणांमुळे कायम चर्चेत राहिली. तिला कन्टेन्टची महाराणी म्हटलं जात होतं. तिचे ‘बिग बॉस’मधील डायलॉग चांगलेच प्रसिद्ध ठरले. (Nikki Tamboli New Show)

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून दोन महिने झाले आहेत. तरीही निक्की तांबोळी खूप चर्चेत असते. कधी अरबाज पटेलबरोबर असलेल्या नात्यामुळे तर कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या हॉट, बोल्ड फोटोमुळे निक्की चर्चेचा विषय असते. अशातच आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे तिचा नवा आगामी शो. निक्की लवकरच ‘सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या शोचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

आणखी वाचा – “मला त्याची गरज नाही”, सुप्रसिद्ध कवी व अभिनेत्याची कपिल शर्मावर आगपाखड, म्हणाले, “तो प्रसिद्ध नव्हता तेव्हा …”

या प्रोमोमध्ये निक्कीची झलक पाहायला मिळत असून तिच्या अगदी शेजारी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीही आहेत. शिवाय तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख, दीपिका कक्कड असे बरेच प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा फराह खान सांभाळणार आहे. तसंच रणवीर बरार, विकास खन्ना परीक्षण करणार आहेत. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाचा प्रोमो पाहून अनेकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई, विधींना सुरुवात, खास फोटो शेअर करत म्हणाली, “शुभ…”

दरम्यान, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ हा कार्यक्रम नक्की कधीपासून सुरू होणार? याची वेळ काय असणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. पण निक्कीच्या चाहत्यांनी तिला पुन्हा एकदा नवीन कार्यक्रमात पाहण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली आहे. ‘बिग बॉस’मध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारी निक्की आता या शोमध्ये काय नवीन जादू करणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे

Tags: bigg boss marathi season 5 nikki tamboliNikki Tamboli Celebrity MasterChef New ShowNikki Tamboli New Show
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Director and producer Mahesh Kothare announced that a new show will soon be launched with the cast of Sukh Mhanje Nakki Kay Asta

‘सुख म्हणजे...’ मालिकेच्या कलाकारांचा पुन्हा एक नवा शो येणार, महेश कोठारेंची मोठी घोषणा, म्हणाले, “लवकरच...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.