कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरु आहे. अनेकांच्या घरी सनई चौघडे वाजत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. काही सेलिब्रिटींनी दिवाळीनंतर मुहुर्त गाठत आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. तर काही कलाकार मंडळी लवकरच बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदे, अभिनेता निखिल राजेशिर्के, पृथ्वीक् प्रताप यांच्यानंतर आता ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीही लग्नबंधनात अडकणार आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे कौमुदी वलोकर. कौमुदीच्या घरी लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे आणि तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवातही झाली आहे. याची खास झलक तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. (Kaumudi Walokar pre-wedding rituals)
आई कुठे काय करते मालिकेत काही दिवसांपूर्वी आलेल्या कौमुदीने प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकली. या मालिकेत तिने यशच्या बायकोची भूमिका साकारली होती. नुकतंच या माळीकतील कलाकारांनी तिचं केळवण साजरं केलं होतं. मालिका संपल्यानंतर लग्नाआधी ‘आई कुठे काय करते’मधील कलाकारांनी तिच्या केळवणाचा थाट केला होता. अभिषेक देशमुख आणि त्याची पत्नी कृतिका देव, अश्विनी महांगडे, सुमित ठाकरे या कलाकारांनी कौमुदीचं केळवणं केलं. याचे फोटो शेअर करत कौमुदीने खास पोस्टही लिहिली होती.
अशातच आता कौमुदीच्या घरी तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. याची खास झलक तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे, कौमुदीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या डोक्याला मुंडवळ्या लावल्याचे पाहायला मिळत आहे. तर आजूबाजूला पूजेचे काही सामानई पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्यही पाहायला मिळत आहे. शिवाय या फोटोवर तिने ‘शुभ आरंभ’ असंही लिहिलं आहे. त्यामुळे यावरुण तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाल्याचे समजत आहे.
आणखी वाचा – लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सचिन पिळगांवकरांचा पत्नीसह भन्नाट डान्स, लेक श्रियाने शेअर केला खास व्हिडीओ
कौमुदीने गेल्यावर्षी साखरपुडा केला होता. आता ती लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश असं आहे. कौमुदी आकाशबरोबर लवकरच सात फेरे घेत संसार थाटणार आहे. अद्याप तिच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. पण तिच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तिचे चाहते मंडळी या लग्नाची वाट बघत आहेत.‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई, विधींना सुरुवात, खास फोटो शेअर करत म्हणाली, “शुभ…”