‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपले असले तरी या शोची आणि शोमधील कलाकारांची चर्चा मात्र अजून थांबलेली नाही. यंदाचे ‘बिग बॉस’चे पर्व अनेक कारणांनी गाजले त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे अभिनेत्री निक्की तांबोळी. निक्की तांबोळी हिचा ‘बिग बॉस’मधील प्रवास वेगवेगळ्या छटांचा राहिला. पण तिचं बेधडकपणे बोलणं यामुळे ती चर्चेत राहिले. निक्की तिच्या भांडणांमुळे कायम चर्चेत राहिली. तिला कन्टेन्टची महाराणी म्हटलं जात होतं. तिचे ‘बिग बॉस’मधील डायलॉग चांगलेच प्रसिद्ध ठरले. (Nikki Tamboli New Show)
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून दोन महिने झाले आहेत. तरीही निक्की तांबोळी खूप चर्चेत असते. कधी अरबाज पटेलबरोबर असलेल्या नात्यामुळे तर कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या हॉट, बोल्ड फोटोमुळे निक्की चर्चेचा विषय असते. अशातच आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे तिचा नवा आगामी शो. निक्की लवकरच ‘सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या शोचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे.
या प्रोमोमध्ये निक्कीची झलक पाहायला मिळत असून तिच्या अगदी शेजारी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीही आहेत. शिवाय तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख, दीपिका कक्कड असे बरेच प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा फराह खान सांभाळणार आहे. तसंच रणवीर बरार, विकास खन्ना परीक्षण करणार आहेत. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाचा प्रोमो पाहून अनेकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई, विधींना सुरुवात, खास फोटो शेअर करत म्हणाली, “शुभ…”
दरम्यान, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ हा कार्यक्रम नक्की कधीपासून सुरू होणार? याची वेळ काय असणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. पण निक्कीच्या चाहत्यांनी तिला पुन्हा एकदा नवीन कार्यक्रमात पाहण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली आहे. ‘बिग बॉस’मध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारी निक्की आता या शोमध्ये काय नवीन जादू करणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे