मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शुटींग पूर्ण झालं. स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या अनेक नव्या मालिकांचा ओघ सुरु आहे. त्यामुळे जुन्या मालिका या प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. याआधी पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करुन ‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपली. त्यानंतर आता ‘सुख म्हणजे काय असतं’ ही मालिकाही लवकरच ऑफ एअर जाणार आहे. गौरी आणि जयदीपची ही गोष्ट सुरुवातीला प्रेक्षकांना फारच भावली. त्यानंतर या मालिकेचा ट्रॅक बदलण्यात आला. (Sukh Mhanje Nakki Kay Asta cast new show)
मालिकेने जवळपास सात वर्षांचा लीप घेतला. तेव्हा प्रेक्षकांनी मात्र बरीच नाराजी व्यक्त केली होती. मात्र तरीही प्रेक्षक या मालिकेवर तितकंच प्रेम करत होते. आशातच आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कोठारे व्हिजन निर्मित ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेसह यातील कलाकारांनाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सुरुवातीपासून टीआरपीच्या शर्यतीत होती.
आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई, विधींना सुरुवात, खास फोटो शेअर करत म्हणाली, “शुभ…”
मालिका संपत असली तरी याच मालिकेच्या कलाकारांना घेऊन पुन्हा एकदा एक नवीन शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबद्दल मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी घोषणा केली आहे. इट्स मज्जाबरोबर संवाद साधताना महेश कोठारे यांनी असं म्हटलं की, “मालिकेचा दूसरा भाग किंवा सीझनबद्दल माहीत नाही. पण याच कलाकारांना घेऊन एक नवीन शो लवकरच सुरु होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरच हा शो येईल अशी मला आशा आहे आणि सध्या माझे त्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत”.
त्यामुळे आता सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या कलाकारांसह महेश कोठारे कोणता नवीन शो घेऊन येणार? या शोमध्ये नवीन काय बघायला मिळणार? हा नवीन शो नक्की कधी येणार? याची उत्सुकता मालिकेच्या व मालिकेतील कलाकारांच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे अनेक जण या आगामी शोच्या उत्सुकतेत आहेत ही नक्की…