‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचा काल (शनिवार) वाढदिवस झाला. यानिमित्ताने त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. चाहत्यांबरोबरच त्याला बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांनीही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. बिग बॉसच्या घरातील त्याची ताई म्हणजेच अंकिता वालावलकरने त्याला थेट फोन लावत शुभेच्छा दिल्या. तसंच त्याच्याकडे एक तक्रारही केली ती म्हणजे त्याची काही माणसे अंकिताचा फोन उचलत नव्हती. तसंच बिग बॉसच्या घरातील सूरजच्या अत्यंत जवळचा माणूस पॅडी कांबळेंनीदेखील सूरजसाठी एक भलीमोठी पोस्ट लिहीत त्याला शुभेच्छा दिल्या. अशातच आता गायक अभिजीत सावंतनेही सूरजला वाढदिवसानमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. (Abhijeet Sawant wished Suraj Chavan)
अभिजीत सावंतने सूरजला व्हिडीओ कॉलद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिजीतने सूरजबरोबरच्या व्हिडीओ कॉलचे संभाषण सोशल मीडियावर शेअर केले आहे. या व्हिडीओ कॉलमध्ये अभिजीत त्याला “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” असं म्हणतो. त्यानंतर अभिजीतच्या मुलीही सूरजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. यानंतर सूरज अभिजीतच्या बायको व मुलींशी गोड संवाद साधतो. त्याच्या मुलींना तो ‘माझा बच्चा माझं पिल्लू’ असं संबोधतो. सूरज व अभिजीत यांच्या या गोड संभाषणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – सलमान खानला वाचवत असल्यामुळे बाबा सिद्धीकींवर गोळीबार झाला का?, सलीम खान भडकले, म्हणाले, “संबंध काय?”
अभिजीत व सूरज यांच्या संभाषणाच्या व्हिडीओला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत उत्तम प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी सूरज व अभिजीत यांच्या या खास मैत्रीचे तसंच सूरजच्या साध्याभोळ्या स्वभावाचे कौतूक केले आहे. तसंच कमेंट्समध्ये अनेकांनी सूरजला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. यापैकी एका कमेंट्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे, निक्की तांबोळीनेदेखील या व्हिडीओखाली कमेंट केली आहे. अभिदादा आणि हसण्याचे इमोजी पोस्ट करत तिने ही कमेंट केली आहे.
दरम्यान, अभिजीने सूरजला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप मोठा आणि यशस्वी हो हीच इच्छा” असं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. बिग बॉसच्या घरातील या खास मित्रांची जोडी प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरली आहे. सध्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून सूरजवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.