Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जादुई हिरा’ या कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्याची घटना घडली. निक्कीने यानंतर घरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. “रागाच्या भरात माझ्याकडून ही चूक झाली”, असं आर्याने कबूल केलं असलं तरी ‘बिग बॉस’च्या घराच्या नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे आर्याला बिग बॉसचं घर सोडून जावं लागलं. ‘बिग बॉस’ यांना आर्याची ही वागणूक खटकली असली तरी नेटकऱ्यांनी आणि काही कलाकारांनी तिला पाठिंबा दिला होता. निक्कीच्या कानशिलात लगावल्याबद्दल आर्याचं सोशल मीडियावर कौतुक झालं होतं. अनेकांनी तिच्या या कृतीचे समर्थन केलं होतं. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या माजी स्पर्धकानेसुद्धा आर्याचं कौतुक केलं आहे. (Aarya Jadhao shared video with Jay Dudhane)
‘बिग बॉस मराठी ५’ची आर्या जाधव आणि ‘बिग बॉस मराठी’चाच माजी स्पर्धक जय दुधाणे भेटले होते. त्याचे काही व्हिडिओ आर्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले असून ते दोघं ‘बिग बॉस’बद्दल चर्चा करताना दिसत आहेत. यावेळी जय बिग बॉसच्या आवाजात असं म्हणतो की, “बिग बॉस सांगत आहेत की, आर्या तुम्ही निक्कीला खूप चांगली कानाखाली मारलीत”. त्यावर आर्या त्याला म्हणते की, “ए तू कॉन्ट्रोव्हर्शिअल (वादग्रस्त) बोल”. पुढे जय म्हणतो की, “त्यात काय झालं आता. शो खतम… रात गयी बात गयी… तू छान केलंस… आणि महाराष्ट्राने तुला पाठींबा दिला”. पुढे आर्या म्हणते की, “मी आता महाराष्ट्राची वाघीण आहे”. यावर जय तिला “याबद्दल तुला स्वत:वर अभिमान वाटला पाहिजे” असं म्हणतो.
आणखी वाचा – Bigg Boss च्या घरात सांगकाम्याचा टास्क, मालकाची करावी लागणारं कामं, कोण कोणाच्या तालावर नाचणार?
यानंतर व्हिडीओच्या शेवटी जय “बिग बॉस आदेश देत आहेत की हा व्हिडीओ आताच्या आता बंद करा” असं म्हणतो आणि आर्याही “ओके बिग बॉस” असं म्हणत व्हिडीओ बंद करते. अशी जय व आर्याची मजामस्ती चाहत्यांना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आर्याने ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेतल्यावर आधीच्या पर्वातील काही स्पर्धकांनीसुद्धा तिच्या खेळाचं कौतुक केलं होतं. अशातच जय दुधाणेने आर्याची भेट घेतली असून दोघांनी त्यांच्या भेटीचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जय यावेळी ‘बिग बॉस’ची नक्कल करताना दिसला.
आणखी वाचा – Akshay Shinde Encounter प्रकरणावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “खऱ्या आयुष्यातील सिंबा…”
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या नवीन पर्वाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या नवीन सीझनने आतापर्यंत ५० हुन अधिक दिवसांचा टप्पा पार केला असून या घरात आता फक्त आठ सदस्य उरले आहेत. त्यामुळे आता अंतिम लढतीसाठी या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या घरात सुरुवातीला मित्र असणारे आता एकमेकांचे शत्रू बनायला सुरुवात झाली आहे.