Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांमध्ये हेवेदावे होताना पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकमंडळी आता इतर स्पर्धकांबाबत गॉसिप करताना दिसत आहेत. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील एका स्पर्धकाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. हा स्पर्धक म्हणजे घनःश्याम दरवडे. घनःश्याम म्हणजेच छोटा पुढारीच वागणं सध्या साऱ्या स्पर्धकांना खटकू लागलं आहे. घनःश्याम घरातील सर्व स्पर्धकांकडे चुगली करतो असं मत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मांडताना दिसत आहे. आता तर घनःश्यामच वागणं त्याच्या टीममधील स्पर्धकांनाही खटकू लागलं आहे.
नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, छोटा पुढारी व निक्कीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत असतानाच आज रक्षाबंधनाच्या दिवशीच या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळाली. निक्की व छोटा पुढारीमध्ये मोठा वाद झाला असल्याचं समोर आलं. त्यानंतर निक्की, डीपी, अंकिता व अभिजीत किचनमध्ये असतात तेव्हा डीपी छोटा पुढारीबद्दल निक्कीसमोर आग लावून देताना दिसत आहे.
डीपी निक्कीला सांगतो, “तुम्ही एखादा पॉईंट घेऊन बोलता तेव्हा तो येऊन आम्हाला बोलतो आमच्याबद्दल असं आहे, आमच्यामध्ये तसं आहे. मला कोणी विचारत नाही. अशा बारीक बारीक गोष्टी नकळत तो बोलून जातो. आता योगिता जायच्या आधीची गोष्ट तुला सांगतो. योगिता जायच्या आधी योगिताजवळ आला. आणि योगिताचा हात हातात घेऊन, ताई तू गेल्यावर मला कोणाचा आधार आहे. यावर निक्कीला धक्का बसतो. निक्कीला शॉक बसतो आणि निक्की जोरात काय असं ओरडते.
धनंजय पुढे म्हणाला, “तेव्हा मी योगिताकडे बघायला लागलो. यावर योगिता मला म्हणाली, मी याला कधी जवळ केलं. मी याला कधी माया दिली आहे”. “मला माया कोण लावणार”, असं तो योगिताला म्हणाला. योगिता तेव्हा असं म्हणाली, “ज्या दिवशी मी दरवाजातून जात असेन आणि त्यादिवशी हा जर ताई करत परत आला तर मी त्याला चापटवेन”, असंही धनंजय म्हणाला.